Homeचंद्रपूरजिवतीशेनगाव येथे TB निदानाचे नवीन उपकरण TRUNAAT कार्यान्वित   डॉ.गहलोत यांची प्राथमिक...

शेनगाव येथे TB निदानाचे नवीन उपकरण TRUNAAT कार्यान्वित   डॉ.गहलोत यांची प्राथमिक आरोग केन्द्र शेनगाव येथील प्रयोशाळेला भेट

बळीराम काळे, जिवती

जिवती : ( ता.प्र.) प्रधानमंत्री यांनी दिलेल्या सूचनेव्दारे 2025 पर्यंत क्षय मुक्त भारत करण्याचे ध्येयपुर्ती उदिष्ट साध्य करावयाचे असून त्या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हा अतिदुर्गम, आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त, डोंगराळ कोरपना व जिवती या तालुक्यातील भागात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत TB आजार, निदान करण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र शेणगाव तालुका जिवती व ग्रामीण रुग्णालय गडचांदूर तालुका कोरपना येथे TB निदानासाठी TRUNAAT या अत्याधुनिक यंत्राचे मा. डॉ. स्वप्नील टेंभे तालुका आरोग्य अधिकारी कोरपना व जिवती यांच्या पाठ पुराव्याने सदर तालुक्याला प्राप्त झालेले आहे .कोरपना व जिवती तालुक्यातील नागरिकांनी TB निदानाचे चाचणी करता लाभ घेण्यात यावा जेनेकरून क्षयमुक्त भारत धेयपूर्ती करण्यास सहकार्य मिळेल. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार कडून असून दूषित क्षय रुग्णांकडून थुंकीकणा मार्फत समोरील व्यक्तीला बाधित करतो. क्षय रोगाची लक्षणे याप्रमाणे आहेत.

1 )दोन आठवड्यापेक्षा अधिक काळ खोकला
2 )वजनात घट होणे
3 )थुंकी वाटे रक्त पडणे
4 )संध्याकाळी येणारा बारीक ताप
5 ) धाप लागने
6 )शरीरातील इतर भागात गाठी असणे
लक्षणे असणाऱ्या नागरिकांनी क्षयरोग तपासणी आरोग्य संस्थेत करून घ्यावी . याशिवाय सिगारेट व विडी ओढणारे, सतत मद्यप्राशन करणारे, सिमेंट कंपन्यात , खाणीमध्ये काम करणारे ,ज्यांना उच्च रक्तदाब ,मधुमेह , किडनीचा आजार ,कॅन्सर आहे अशा रुग्णांनी सुद्धा TB तपासणी करून घ्यावी व सध्या प्रत्येक गरोदर मातेला सुद्धा TB आजाराची तपासणी करणे आवश्यक आहे .
कोरपना तालुक्यात ग्रामीण रुग्णालय गडचांदूर व कोरपना येथे एक्स-रे द्वारे संशयित TB रुग्णाची तपासणी करता येते.
तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती, पाटण , नाराडा व ग्रामीण रुग्णालय कोरपना व गडचांदूर येथे थुंकी द्वारे सुद्धा क्षय रुग्णाची तपासणी करण्यात येत. प्राथमिक आरोग्य केंद्र शेनगाव येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गहलोत सर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सेनगाव येथे भेट देऊन आरोग्य केंद्राची प्रयोगशाळेची पाहणी करण्यात आली.
सदर Truenaat मशीन स्थापित करण्याकरिता जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश साठे सर कोरपना तालुक्याचे एसटीएस श्री पारखी जिवती तालुक्याचे श्री बरडे. तसेच श्री राजेश हिरेमठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!