महागाईच्या काळात सामूहिक विवाह ही काळाची गरज – डॉ. नामदेव किरसान… सामूहिक विवाह सोहळ्यानने समाज एकसंघ व संघटित राहण्यास मदत…

365

दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी मौजा सोनसरी ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथे आदिवासी हलबा/हलबी समाज संघटनेच्या वतीने आयोजित सामूहिक विवाह सोहळ्याचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा गडचिरोली जिल्हा प्रभारी डॉ. नामदेव किरसान यांनी सामूहिक विवाहाचे महत्व पटवून देतांना सांगितले कि, आज अतोनात वाढलेल्या महागाईत सामूहिक विवाहास विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. डिझेल पेट्रोल गॅस सह सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढलेल्या आहेत व त्यात सतत वाढ होत आहे. अश्या परिस्थितीत खर्चाची बचत करने गरजेचे आहे, सामूहिक विवाहाच्या आयोजनाने ते शक्य आहे. एवढंच नव्हे तर अश्या आयोजणामुळे समाज एकसंघ व संघटित राहण्यास मदत होते. समाज संघटित राहिल्यास कोणत्याही समस्येचा सामना समाज करू शकतो. सामूहिक विवाहची परंपरा या समाजाने गेल्या 22 वर्षापासून जपून ठेवलेली आहे व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पडलेल्या खंडानंतर लगेच यावर्षी सोनसरी वासियांनी सामूहिक विवाहाचे आयोजन केले त्यामुळे ते अभिनंदनास पात्र आहेत. पुढे डॉ. किरसान यांनी नवविवाहीत वधुवरांना भावी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा दिल्या व वरवधूंच्या पालकांनी सामूहिक विवाह सोहळ्यात त्यांच्या मुला मुलींचे लग्न दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.