गुरुदेव सेवा मंडळच्या वतीने तुकडोजी महाराज जयंती निमित्त पालखी सोहळा…

341

राजुरा: तालुक्यातील गुरुदेव सेवा मंडळ व समस्त वरूर वासीय जनतेकडून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. गुरुदेव सेवा मंडळ तर्फे तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त तुकडोजी महाराज यांची भव्य पालखी पदावली भजनं मंडळ वरूर रोड आणि आणि समस्त गावकरी यांच्या कडून करण्यात आली.यावेळी प्रत्येक चौकात थोर महापुरुष यांच्या प्रतिमेचे पूजन, गुरुदेव सेवा मंडळच्या अध्यक्षा सौ. बेबीताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच गुरुदेव सेवा मंडळचे सर्व सदस्य या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होते.पालखी सामुदायिक प्रार्थना स्थळ येथून फिरून येऊन सामुदायिक प्रार्थना स्थळ येथे परत आली. सामुदायिक प्रार्थना करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी गुरुदेव सेवा मंडळचे सचीव विकास कोतपल्लीवर, मंडळाचे सदस्य चरणदास जेणेकर, विजय बोबडे, मुकुंदा पा. गुघुल, मयूर जानवे, स्वप्नील जीवतोडे, प्रज्वल बोरकर ,नवनाथ पा. बोरकुटे, ताराचंद सलामे, मधुकर भगत, सुरेखा जानवे, सुरेखा बोरकुटे, आदी महिला सदस्य व गावातील विद्यार्थी उपस्थित होते.