Homeचंद्रपूरसावलीदबा धरुन असलेल्या वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार सावली तालुक्यातील वाघोली...

दबा धरुन असलेल्या वाघाच्या हल्ल्यात शेतकरी महिला ठार सावली तालुक्यातील वाघोली बुटी येथील घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण….

सावली: तालुक्यातील वाघोली बुटी येथील शेतशिवारात काम करीत असताना दबा धरुन असलेल्या पट्टीदार वाघाने हल्ला करुन महिलेवर ठार केले. मृतक महिलेचे नाव ममता हरिश्चंद्र बोदलकर ( वय ७०)असे आहे. ही घटना बुधवारी ( ता.२६) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली.याबाबत परिसरातील शेतकऱ्यांना माहिती होताच त्यांनी आरडा-ओरड केली. गावकऱ्यांनी शोधाशोध केली असता महिला मृत अवस्थेत सापडली. सदर घटनेची माहिती सावली पोलीस व वन विभागाच्या अधिकाऱ्याला देण्यात आली. पोलीस व वनविगाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करुन मृतक महिलेचा शव उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालयात पाठविले. या झालेल्या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यात मागील एक वर्षापासून मानव वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात सुरु आहे. एका वर्षामध्ये वाघ व बिबट्याच्या हल्यात जवळपास २१ शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट वाघांनी घेतला आहे. वनविभागाने वाघ आणि बिबट्याचा बंदोबस्त करवा अशी गावातील नागरिकांनी मागणी केली केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!