Homeचंद्रपूरएका आठवड्यात चेक न मिळाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा; राहुल देवतळे शहर उपाध्यक्ष...

एका आठवड्यात चेक न मिळाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा; राहुल देवतळे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

चंद्रपूर: महानगरपालिका अंतर्गत केंद्रशासन पुरस्कृत “सर्वांसाठी घरे २०२२” संकल्पनेवर आधारीत “प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) भागासाठी राबविण्यात येत आहे. घरकुल योजनेच्या घटक क्र. ४ मध्ये शासनाच्या निकषानुसार आर्थिक व दुर्बल गटात पात्र असलेल्या कुटुंबांना त्यांच्याकडे असलेल्या स्वतःच्या मालकीच्या जागेवर घरकुल बांधण्यासाठी शासनातर्फे अनुदान देण्यात येते आहे.

यामध्ये ४०७, २८६, ३६६ व १९२ असे लाभार्थी समाविष्ट आहे. यातील एकुण तीन प्रकल्पांना केंद्रीय मान्यता व सनियंत्रण समिती (CSMC) यांची मंजूरी प्राप्त झाली आहे.यामुळे लाभार्थ्यांची बांधकामे सुरु आहेत. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थीला एकुण २.५० लक्ष अनुदान मिळत असते.आणि लाभार्थीनी केलेल्या बांधकामाच्या प्रगतीनुसार हप्त्यांचे वितरण करण्यात येते.
शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल योजनेच्या ४०७ आराखड्यातील मिळालेल्या राज्य शासनाचा संपूर्ण निधी खर्च झालेलाआहे. महानगर पालिका यांनी पत्राद्वारे कळविले की, केंद्र शासनाचा निधी अजूनपर्यंत प्राप्त झालेला नाही. महानगर पालिका यांना वारंवार पत्र देऊनही याकडे या विषयाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
आराखड्यातील पात्र लाभार्थींना बांधकामाचे प्रगतीनुसार पुढील हप्त्यांचे वितरण करण्यास अडचण निर्माण होत आहे. केंद्र सरकारच्या निधीसाठी वेळोवेळी मागणी करुनही निधी मंजूर झालेली नाही. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना निधी अभावी काम बंद ठेवावे लागत आहे.केंद्र शासनाचा निधी प्राप्त होताच सदर डी.पी.आर. मधील लाभार्थीना त्यांचे बांधकामाचे प्रगतीनुसार पुढील हप्त्यांचे वितरण करण्यात येईल. परंतु ४०७ आराखड्यातील लाभार्थांना केंद्र शासनाचा निधी लवकरात लवकर प्राप्त करून द्यावा, नाहीतर आम्ही जन आंदोलन करू असा राहुल देवतळे, शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी इशारा दिला.केंद्र सरकारची निधी लवकर मिळावी
याकरिता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शुभम ठाकरे, वसंता पवार, नयन डोईफोडे, आशिष खडसे,अखिलेश राऊत, प्रतिभा खडसे, आशा बावणे,किरण गेडाम, आशा बावणे उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!