Homeचंद्रपूरआमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, २४ रस्त्यांचे होणार कॉंक्रिटीकरण ग्रामीण भागाच्या...

आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांना यश, २४ रस्त्यांचे होणार कॉंक्रिटीकरण ग्रामीण भागाच्या विकासासाठी २ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजुर….

चंद्रपूर: मतदार संघातील ग्रामीण भागाचा विकास व्हावा ,तसेच ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट व्हावी, त्यांच्या विकासासाठी आर्थिक निधी मिळावी या मागणीसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी अथक प्रयत्न केले होते.

तसेच त्यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरू होता.यामध्ये आमदार किशोर जोरगेवार यांना यश आले आहे.ग्रामीण भागाच्या विकासासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत २ कोटी ४० लक्ष रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या निधीतून ग्रामीण भागातील २४ रस्त्यांचे कॉंक्रीटकरण करण्यात येणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरी भागासह ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करुन दिला आहे.त्यांनी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत ३९ कोटी रुपयांचा निधी आणला आहे. यातून ग्रामीण भागाला ,शहरी भागाशी जोडणाऱ्या मार्गाचे काम केल्या जाणार आहे.सदर निधीतून चिंचाळा, छोटा नागपूर, देवाडा, नकोडा, पांढरकवडा, पिपरी, मारडा, वेंडली, शेणगाव, सिदूर सोनेगाव येथे सिमेंट कॉंक्रिटच्या रस्त्याचे काम केल्या जाणार आहे. यामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था बळकट होणार आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!