Homeचंद्रपूरराजुराबादल बेले यांचा महाराष्ट्र राज्य पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव. - दिपक केसरकर,...

बादल बेले यांचा महाराष्ट्र राज्य पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव. – दिपक केसरकर, शिक्षण मंत्री, मराठी भाषा मंत्री (म.रा.) तथा पालक मंत्री मुंबई उपनगरी व शहर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान. – नालासोपारा येथे पहिले कोकण विभाग स्तरीय पर्यावरण संमेलन संपन्न.

राजुरा :नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था कोकण विभाग द्वारा आयोजित पहिले कोकण विभाग स्तरीय पर्यावरण संमेलन 2023 मध्ये या नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल नीलकंठ बेले यांना संमेलनाचे उद्घाटक नामदार दीपक केसरकर, शिक्षण मंत्री, मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, मुंबई उपनगरी व शहर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह शाल व श्रीफळ देऊन महाराष्ट्र राज्य पर्यावरण भूषण हा पुरस्कार देऊन बेले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुयोग धस, आदर्श महाराष्ट्र भूषण,संस्थापक अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था तथा सदस्य, विश्व पर्यावरण परिषद हे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक भवर, राष्ट्रीय सचिव सचिन वाघ, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रकाश कदम, महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, राज्य महिला सचिव आसिया रिझवी, विश्वाजी सावंत, पालघर जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, विजय मांडवकर, अखिल भारतीय कामगार संघ भाजपा उपाध्यक्ष, कोकण विभाग अध्यक्ष बापू परब आदीसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

पाहिले कोकण विभाग स्तरीय पर्यावरण संमेलन हे शाम मंडप डेकोरेटर्स हॉल, डेपो रोड, स्टेशनं जवळ, नालासोपारा (पश्चिम )या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाच्या सुरुवातीला नालासोपारा स्टेशनं ते संमेलन स्थळापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. यात लक्षवेधी वृक्षदिंडी, घोडा, बैलगाडी, लेझीम पथक, महाराष्ट्रीयन वेशभूषेतील स्त्रिया, विध्यार्थी यांनी वेगवेगळे संदेश देणारे फलक हातात घेऊन या वृक्षदिंडीत सहभागी झाले होते. संमेलनाचे विशेष आकर्षण म्हणजे निसर्ग फोटो ग्यालरी ही प्रकाश कदम यांनी लावली. निसर्ग पेंटिंग ग्यालरी प्रिया कदम, किल्ले फोटो ग्यालरी व विविध प्रजातीच्या वृक्षाच्या बियांची प्रदर्शनी जगदीश धनमेहेर, पल्लवी पवार यांनी लावली होती. तर संमेलनात सृजनांकूर वेध पर्यावरण संवर्धनाचे या विशेषँक चे मान्यवराच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा जामदार व सीमा तायडे यांनी केले. तर प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्हाअध्यक्ष जॉवेल डिसिल्वा यांनी तर आभार प्रदर्शन कोकण विभाग अध्यक्ष बापू परब यांनी केले. सृजनांकुर वेध पर्यावरण संवर्धनाचे या विशेषँक चे संपादक मंडळ मधील प्रकाश कदम, ऋतुजा गवस, वंदना पाटील, रामकृष्ण गवस, बापू परब, जाहिरात विभागातील मिताली साळुंखे, सुवर्णा दळवी, अनिल कदम, शिवाजी पाटील, वृक्षदिंडी प्रमुख आशिया रिजवी, मिताली साळुंखे, सुवर्णा दळवी, शिवाजी पाटील, पल्लवी पवार, अनिरुद्ध पवार, श्रद्धा सर्वेकर आदीसह नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था कोकण विभाग संपूर्ण राज्य कार्यकारणी, विभाग, जिल्हा, तालुका कार्यकारणी व संघटक सदस्य यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. या संमेलनामध्ये पर्यावरण पूरक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांचा, व्यक्तींचा सत्कार समारंभ तसेच पर्यावरण पूरक सण व उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम, सणांचा महिमा या लक्षवेधी कार्यक्रमाचे सुद्धा सादरीकरण करण्यात आले. या संमेलनाला कोकण विभागातील विविध जिल्हे तसेच संपूर्ण महाराष्ट्र मधील नेफडो चे पदाधिकारी, सदस्य, संघटक, व इतर पर्यावरण प्रेमी नागरीकांची उपस्थिती होती.

———————————————-
बादल बेले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, नेफडो, भारत

निसर्गाने नटलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सोबतच इतरही भागात कार्य करताना मला माझ्या विध्यार्थी, पालक, सहकारी शिक्षक, पत्नी, मित्र परिवार आणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या पदाधिकारी, संघटक यांचे अनमोल असे सहकार्य लाभत असते. अनेकदा वनविभाग व सामाजिक वनिकरण विभागाच्या अधिकारी आणी कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे मला पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य करण्याची ऊर्जा प्राप्त होतं असते. आपल्या हातून पर्यावरण संवर्धनाचे हे पवित्र कार्य होतं असल्याचे समाधान असतानाच पुरस्कार मिळणे म्हणजेच माझ्यावरील जबाबदारी वाढली असून जे कार्य करणार ते प्रामाणिकपणे करणार असे प्रतिपादन हा पुरस्कार स्वीकारताना बादल बेले यांनी मनोगत व्यक्त केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!