Home गडचिरोली घोट रेगडी मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात… अपघातात दोघे गंभीर जखमी

घोट रेगडी मार्गावर दुचाकीचा भीषण अपघात… अपघातात दोघे गंभीर जखमी

1635

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

रेगडी: चामोर्शी तालुक्यातील रेगडी मार्गावर आज सायंकाळी सुमारे चार वाजताच्या सुमारास माडेआमगाव फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात झाला. दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियत्रंण सुटल्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबास जोरदार धडकली. या अपघातात दोघेजण गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

घटनेची माहिती समाज सेवक प्रशांत शाहा यांना देण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच समाजसेवक प्रशांत शाहा यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र रेगडी येथील वैद्यकीय अधिकारी श्री,उमाकांत मेश्राम यांच्याशी संपर्क साधून अंबुलन्सची व्यवस्था केली व त्यानंतर पोलीस मदतकेंद्र रेगडी येथे माहिती देण्यात आली. अपघातग्रस्तांना गडचिरोली जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

अपघातग्रस्त इसमाची ओळख अजूनही पटलेली नसून पुढील तपास पोलीस मदत केंद्र रेगडी येथील प्रभारी अधिकारी श्री,नंदकुमार शिंब्रे यांच्या नेतृत्वाखाली पो शी दीपक पिटाले,नरेंद्र धोंडणे हे करीत आहेत.

Don`t copy text!