श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर)
चंद्रपूर: स्त्री शिक्षणाची ज्योत तेवत ठेवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मुस्लिम समाजातील आद्य शिक्षिका फातिमा शेख यांची जयंती हक्कानी मदरसा येथे साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जी. प. सभापती रोशनी खान, मदरसाचे हाफिझ साब अब्दुल कबीर, माजी सरपंच गीता वैद्य, ओबीसी महिला आघाडीच्या अध्यक्ष अरुणा चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या पारुल शेख आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना माजी सभापती रोशनी खान म्हणाल्या की, फातिमा शेख या मुस्लिम समाजाच्या पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्यासमवेत स्त्री शिक्षणासाठी मोलाचे कार्य केले. त्यांनी घरोघरी जाऊन शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. त्यामुळे आज महिला मोठमोठ्या पदावर विराजमान झाल्याचे सांगितले. यावेळी केक कापून फातिमा शेख यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मदरदाचे विदयार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते..