Homeगडचिरोलीसावधान रेगडी,गरंजी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन.. पहिल्याच हल्ल्यात केला बैलाला ठार..

सावधान रेगडी,गरंजी परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन.. पहिल्याच हल्ल्यात केला बैलाला ठार..

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

रेगडी:- आज सकाळी ८:३०वाजता रेगडी ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट असलेले गरंजी या गावात पट्टेदार वाघ दिसून आला.
सकाळी सुमारे ८ वाजता गरंजी येथील नागरिक
दुर्गु गोटा,प्रशांत टोप्पो,बाजीराव हिचामी, तुकाराम कंगाली हे नेहमी प्रमाणे गुरे राखण्याकरिता गावलगतच्या जंगलात गेले असता त्यांना पट्टेदार वाघ एका बैलाची शिकार करत असतांना त्यांना दिसून आले.त्यांनी हा प्रसंग पाहताच उर्वरित बैलांचा कळप घेऊन गावात परत आले व गावकऱ्यांना माहिती दिली. माहिती मिळताच गावातील कोतवाल विनोद गोटा यांनी आमच्या इंडिया दस्तक न्युज टिव्ही शी संपर्क साधून वनविभागाला माहिती दिली.

वनविभागाचे कर्मचारी गावातील लोकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले. आणि वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या बैलाचे पंचनामा करून त्वरीत बैल मालकाला आर्थिक मदत द्यावी अशी मांगणी गरंजी येथील नागरिकानकडून केली जात आहे.
या पुढील तपास वनविभाचे कर्मचारी करीत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!