Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने पाकिस्तानचे बिलावल भुट्टो यांचा निषेध

भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने पाकिस्तानचे बिलावल भुट्टो यांचा निषेध

363

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

 गडचिरोली : देशोधडीला लागलेले पाकिस्तानचे विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताचे लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केल्याने संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली असून त्यांचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने स्थानिक इंदिरा गांधी चौकामध्ये बिलावल भुट्टो यांच्या प्रतिमेचे दहन करून आंदोलन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, जेष्ठ नेते तथा किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जिल्ह्याचे उपाध्यक्ष युवा ओबीसी नेते प्रणय खुणे, नगर परिषदेच्या माजी अध्यक्षा योगिता पिपरे, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासराव देशमुखे, महीला मोर्चाच्या शहराच्या अध्यक्षा कविता उरकुडे, माजी नगर सेविका निता उंदिरवाडे, लता लाटकर, कोमल बारसागडे, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सागर कुंभरे, युवा नेते सोमेश्वर धकाते, कापकर, तालुक्याचे नेते देवानंद चलाख, यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पाकिस्तानच्या व पाकिस्तानचे  विदेश मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आले.

Don`t copy text!