Advertisements
Home Breaking News जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका - माजी मंत्री वडेट्टीवार... आढावा बैठकीत वनाधिकाऱ्यांना...

जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका – माजी मंत्री वडेट्टीवार… आढावा बैठकीत वनाधिकाऱ्यांना अल्टिमेटम – त्वरित उपाय योजना करण्याचे निर्देश…

ब्रह्मपुरी मतदार संघातील व जिल्हयातील इतर तालुक्यातही हिंस्त्र प्राण्यांनी उन्माद घालत हल्ले चढवून ठार करण्याच्या घटना दररोज घडत आहे. अशातच सामान्य नागरिकांचा नाहक बळी जात असून वन विभाग प्रशासने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न बघता तातडीने उपाय योजना करण्याचे निर्देश राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते ,आ. विजय वडेट्टीवार यांनी आज सावली येथे वनाधिकाऱ्यांसमवेत आयोजित विशेष बैठकीत दिले.

Advertisements

आयोजित बैठकीस मुख्य वनसंरक्षक लोणकर, विभागीय वनाधिकारी खाडे, माजी जि. प. उपाध्यक्ष संदिप गड्डमवार, माजी जि. प. सभापति दिनेश चिटनुरवार , वनपरिक्षेत्र अधिकारी विरुटकर, नायब तहसीलदार कांबळे, माजी प. स. सभापति विजय कोरेवार, सावली नगराध्यक्षा लता लाकडे,सावली काँग्रेस ता. अध्यक्ष नितिन गोहणे, शहर अध्यक्ष विजय मुत्यालवार, युवक अध्यक्ष आशिष मनबत्तुलवार, व काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वन विभाग कर्मचारी, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात सुरू असलेल्या मानव वन्यजीव संघर्ष यावर माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात वाघांची संख्या किती..? असा सवाल विचारताच वनाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. वाघांची वाढती संख्या व दैनंदिन होणारे हल्ले यामध्ये जात असलेल्यांना बळींबाबत चिंता व्यक्त करीत माजी मंत्री वडेट्टीवारांनी वनाधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. दिवसागणिक वाढत असलेल्या वाघांच्या संख्येत भर पडत असताना वनविभाग अनभिज्ञ कसा? असा सवाल त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. क्षेत्रातील जनता यांच्या जीवाचे रक्षण करणे लोकप्रतिनिधीचे आद्य कर्तव्य असून जिल्ह्यातील संपूर्ण वाघाची मोजणी करून आरक्षित क्षेत्र मर्यादेपेक्षा अधिक वाघांची स्थलांतर करावे व वन व्याप्त क्षेत्राला जाळीचे कंपाऊंड, गावातील पर्यंत सोलर लाईट बसविणे, गावातील वीस तरुणांना कामावर घेऊन एक चमु गठीत करून रात्रपाळी गस्त सुरू करणे, तसेच गावातील गुराखी, शेतकरी, शेतमजुरी यांना स्वसंरक्षणासाठी करंट काठी, मुखवटे आदिसह वनातून शेतीकडे जाणारा पायवाट मार्ग रुंद व परिसरातील गवत झुडपे कापून सफाई करणे, गावाला जात आहे असलेल्या झुडपांची सफाई करणे, नादी उपायोजना तातडीने करण्याचे निर्देश माजी मंत्री वडेट्टीवार यांनी वनाधिकाऱ्यांना दिले. तसेच वनलगत ग्राम खेड्यांसाठी उपलब्ध प्रमाणात निधी उपलब्ध करून नागरिकांचे संरक्षणासाठी विविध उपाययोजना करावी व वन्य प्राण्यांकडून होत असलेली शेतमिकांची नासधुस याचा योग्य पंचनामा करून नुकसान भरपाई त्वरित द्यावी. जनतेच्या जीवनाचे मोल समजून घेऊन वनविभागाने हिंस्त्र पशू हल्ल्या संदर्भात सर्व सामान्य नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत न बघता कठोर पावले उचलावी अन्यथा वन्यजीव हल्ल्यात बळी पडलेल्या मृदा देहाला घेऊन चक्क वन विभाग कार्यालयात आंदोलन करणार असा इशाराही माजी मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी यावेळी वनाधिकाऱ्यांना दिला

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील – माजी मंत्री वडेट्टीवार

सिंदेवाही : जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या हक्काच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. या रास्त मागण्यांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीने शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन वेळोवेळी...

फारेस्ट ग्राउंड मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

आलापल्ली : आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आल्लापल्ली येथील फारेस्ट ग्राउंड(क्रिडा संकुलंन) या ठिकाणी आज ठीक ७:३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत...

एक लाखाची लाच घेताना मंडल अधिकाऱ्यांसह एकाला अटक…लाचलुचपत विभागाची धडक कारवाई

अवैधरित्या मुरूम उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी एक लाख रुपये घेताना पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावचे मंडल अधिकारी रणजीत मोरे यांच्यासह साहेबांचा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या “डीडोळकर’ नामकरणाला स्थगिती

: माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव...

महिलांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन सत्याच्या बाजूने उभे व्हा : नम्रता ठेमस्कर

घुग्घूस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 येथे सौ. पदमा राजूरेड्डी यांच्या वतीने हळदी - कुंकू व वाण वाटप कार्यक्रम 28 जानेवारी रोजी...

व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह… -प्रा.शाम धोपटे

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक) चंद्रपूर- अँलअँनाॅन परिवार समुह या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या "सुप्रभात अँलअँनाॅन परिवार समुह चंद्रपूर येथे स्थापन होऊन चार वर्ष पूर्ण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!