Homeचंद्रपूरराहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर)

चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध विनामूल्य देण्यात येत असते.परंतु रुग्णांना व रुग्णाच्या नातेवाइकांना औषध पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसल्यामुळे त्यांना बाहेरून औषध घेण्यास सांगण्यात येत आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाइकांना ह्या साऱ्या समस्येमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या सर्व गोष्टी ची दखल घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांचे नेतृत्त्वात जिल्हा शल्य चिकीत्सक यांना औषध साठा आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात यावा याकरिता निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदन देताना सागर वानखेडे, अक्षय सहदेव, ठाकरे, विजू बोरकुटे, नयन डोईफोडे, अखिलेश राऊत हे उपस्थित होते…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!