Homeचंद्रपूरजिवतीमहाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष... केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती

जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
देविदास पवार यांच्या घरापासून उद्धव गायकांबळे यांच्या घरापर्यंत वीज वाहक तार हे हाताला पोहोचतील येवढ्या उंचीपर्यंत येऊन लोंबकळत आहेत व हवेमुळे हेलकावे खात आहेत. त्यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संदर्भात महावितरण जिवती येथील अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न संतापलेल्या गावकरी मंडळीकडून उपस्थित केल्या जात आहे.
वास्तविक पाहता पावसाळा लागण्यापूर्वी प्रत्येक विधुत उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात तारा, खांब याचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तारा बदलणे, झुकलेले खांब सरळ करणे, लोंबकळलेल्या तारा सरळ करणे तुटलेल्या तारा जोडणे ही कामे प्राधान्याने करून घेणे गरजेचे असताना सबंधित विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

कोट – सबंधित विभागाने जातीने लक्ष घालून त्वरित केकेझरी येथील झुकलेला पोलवरील हेलकावे खात असलेल्या तारेचे सोय करून होणारी तारे अभावी जीवित हानी टाळावी.
– शांतकुमार गोरे, ग्राम पंचायत सदस्य(केकेझरी)

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!