HomeBreaking Newsराजुरा मतदारसंघातील कोरपना महिला काँग्रेस ची शहर व तालुका आढावा बैठक

राजुरा मतदारसंघातील कोरपना महिला काँग्रेस ची शहर व तालुका आढावा बैठक

राजुरा: आमदार सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनात आणि महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य-ठेमस्कर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 1 डिसेंम्बर पंचशील भवन कोरपना इथे राजुरा मतदारसंघातील कोरपना महिला काँग्रेस ची शहर व तालुका आढावा बैठक संपन्न झाली.

आढावा बैठकीची सुरवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बोधिसत्व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून झाली. यावेळी उपस्थित महिलांनी आपला परिचय करून देऊन आपले राजकीय विचार व्यक्त केले. यावेळी जिल्हाध्यक्षा ठेमस्कर यांनी उपस्थित महिलांना महिला काँग्रेस च्या संघटने विषयी माहिती दिली.

या बैठकीला कोरपना नगर पंचायती च्या नगराध्यक्षा नंदा बावणे, गडचांदूर नगरपंचायतिच्या नगराध्यक्षा सविता टेकाम यांची प्रमुख उपस्थिती होती त्याच बरोबर तालुका अध्यक्षा ललिता गेडाम,गडचांदूर शहर अध्यक्ष प्रियंका पिंपळकर यांची तसेच महिला सारपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह बहुसंख्य महिला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सोबतच सेवा फौंडेशन काँग्रेस च्या शहर अध्यक्ष शितल कातकर, तसेच सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, चंद्रपूर जिल्हा सोशल मीडिया चे अध्यक्ष मुन्ना तावाडे यांची उपस्थिती होती. कोरपना तालुक्यातील काँग्रेस चे जेष्ठ नेते विजय बावणे यांनी या आढावा बैठकीत साठी मोलाचे सहकार्य केले…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!