Homeअहेरीएस टी कंडक्टरची मुलगी बनली राज्य कर निरीक्षक व मंत्रालय सहाय्यक कक्ष...

एस टी कंडक्टरची मुलगी बनली राज्य कर निरीक्षक व मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी.. गडचिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे दोन परीक्षा एकाच वेळीच उत्तीर्ण करून हर्षल सुनीलराव पोलशेट्टीवार यांनी गाठले यशाचे शिखर.

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

अहेरी :- म्हणतात ना ” हे जग त्याच्याच पुढे झुकते, जो परिस्तिथी समोर झुकलेला नसतो. नुकताच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग संयुक्त राजपत्रित गट ब परीक्षा २०२१ च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाले त्या मध्ये गडचिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे ” राज्य कर निरीक्षक व मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी ” असे दोन परीक्षा उत्तीर्ण करून नवा इतिहास दक्षिण अहेरीसह गडचिरोली मध्ये घडविला आहे.

हर्षलने एमपीएससी मार्फत झालेली एसटीआय व एएसओ परीक्षा उत्तीर्ण केली असून, तिची सहाय्यक क्षक अधिकारी व राज्य कर निरीक्षक पदावर निवड झालेली आहे. आईचे छत्र हरविल्यानांतर वडिल सुनीलराव पोलशेट्टीवार व आपल्या लहान भाऊ सुमेद पोलशेट्टीवार यांना धीर देत अनपेक्षित खांद्यांवर आलेल्या घराची जबाबदारी सांभाळत अभ्यासातील सातत्य जिद्दी, मेहनतीने हे यश प्राप्त केलं आहे. तिच्या यशाचं सर्वत्र गावात कौतुक होतं आहे.

सामान्य घराण्यातील हर्षल ला लहानपणापासून अभ्यासाची आवड तिच्या आईमुळे लागली होती. तिने प्राथमिक, माध्यमिक शिक्षण अहेरीतच पुर्ण केले नंतर अकरावी व बारावी हैदराबाद येथील नारायना जुनिअर कॉलेज येथुन झाले, त्यांनतर बापुराव देशमुख कॉलेज ऑफ इंजीनियरिंग सेवाग्राम वर्धा येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यातूनच तिला कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरी मिळाली त्यात पॅकेजही उत्तम होते, चांगली नोकरी करतांना तिला अश्या लक्षात आलं कि स्वतःच्या उन्नत्ती सोबतच समाजाच्या उन्नत्तीसाठी आपण काही तरी करायला हवं त्यामुळे तिने स्पर्धा परिक्षा देण्याचं ठरवून हातात असलेली नोकरी सोडून पुणे गाठले. तिच्या या निर्णयाला घरच्यांनी पूर्ण पाठिंबा दिला.

राज्य लोकसेवा आयोगाच्या पहिली राज्यसेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी १३ मार्क, एसटीआय पूर्व परीक्षेला ६ मार्क व एएसओ पूर्व परीक्षेला १ मार्क कमी पडले. दुसऱ्या प्रयत्नात पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली पण मुख्य परीक्षा अनुत्तीर्ण झाली. दहावीला 92 टक्के आणि बारावीला 93.5% मिळणाऱ्या हर्षलसाठी हे अपयशाचे धक्के पचवणे जरा कठीणच होते, या अपयशाने पेटून उठून परत जोमाने अभ्यास सुरु ठेवली, यादरम्यान आई वडिलांच्या पैशावर अवलंबून आहोत ही भावना सुद्धा तिला टोचत असल्याने अभ्यासासोबत नोकरी करायचा व स्वतःचा खर्च स्वतःच भागवायचा म्हणून पुण्यात खाजगी क्षेत्रात नोकरी केली. नोकरी व अभ्यास अशी तारेवरची कसरत सुरू होती पण तेवढ्यात कोरोना महामारी आली व परीक्षा कधी होईल याचे उत्तर कोणाकडे नव्हते.

कोरोना काळात घरीच अभ्यास सुरू ठेवले, दरम्यान 2021 मद्ये आईचे निधन झाल्याने ती खचून गेली मात्र त्या दुःखातून स्वतःला सावरत आपले पद हेच आईला श्रद्धांजली होईल व एक अधिकारी होताना बघणे हेच आईचे स्वप्न होते व हे स्वप्न पूर्ण करायचे आहे हे निश्चय केले.

आईच्या निधनानंतर घरची जबाबदारी सांभाळत वडिल सुनील पोलशेट्टीवार, भाऊ सुमेदला धीर देत अभ्यास कायम ठेवले, वडील राज्य परिवहन महामंडळ मध्ये वाहक या पदावर कार्यरत आहेत, याच काळात एसटीचा तीन चे चार महिन्याच संप सुरू झाला, पण तिच्या वडिलांनी आर्थिक झड मुलांवर पोहाचवू दिली नाही, यातच तीने यशाचे शिखर गाठले व आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलें.

*यशाचे श्रेय -*
हर्षलने आई सौ. प्रतिभा एस पोलशेट्टीवार जीनी माझ्यावर पुर्ण विश्र्वास दाखवला, मला अभ्यासात कुठल्याही प्रकारची अडथळा येऊ दिल्या नाही, सोबतच वडील सुनील पोलशेट्टीवार ज्यांनी ममला शिक्षनाच स्वतंत्र दिला, माझी प्रत्येक इच्छा पुर्ण केले, आई गेल्यानंतर घरची जबाबदारी एकटीवर पडू दिली नाही, तसेच भाऊ सुनील नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला मला मानसिक आधार दिला व मैंत्रीन ऋचा वाघोले ( आकोट ) हीने कठीण काळात अभ्यासासाठी प्रेरित केले.

*उपजिल्हाधिकरी बनायचं मानस*

सध्या राज्यसेवा २०२१ च्या मुलाखती ला आहे, राज्यसेवा २०२२ च्या मुख्य परीक्षेला आहे, यातून मला उपजिल्हाधिकारी पदावर जावून समाजाच्या एका मोठया व्यासपीठावरून काम करता येईल असे तीने इच्छा बोलून दाखवली.

*गडचिरोली जिल्हात सुधारणा ?*

हर्षल सांगते की, मी माझ्या स्वतःच्या घरी अहेरी ला राहुन अभ्यास केलो, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका अहेरी येते काही काळ अभ्यास केले, जिल्हातील खेड्या पाड्यात अभ्यासाला पोषक वातावरण निर्माण होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!