Homeअहेरीअहेरी - खमणचेरू रस्ता दोन वर्षांपासून प्रतीक्षेत. रस्त्याची दुरावस्था झाल्याने या...

अहेरी – खमणचेरू रस्ता दोन वर्षांपासून प्रतीक्षेत. रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावरील शाळकरी विद्यार्थीना नाहक त्रास.. संबंधित बांधकाम विभाग कुंभकरन्याच्या झोपेत..

दिपक सुनतकर (अहेरी)

अहेरी – येथील अहेरी – खमणचेरू रस्त्याचे डांबरीकरनाचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असल्याने याचं परिणाम सामान्य जनतेला व शाळकरी विद्यार्थीवर होत आहे.
हा रस्ता जवळपास सात ते आठ किलोमीटरचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम होत नसल्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना व शासकीय कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावे लागत आहे. आतापर्यंत वेग वेगळ्या लोकप्रतिनिधींकडून या मार्गाचे दोन दोन वेळा उद्घाटन करण्यात आले होते, मात्र आजतागायत रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही.

या रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालय, प्रकल्प कार्यालय, एकलव्य मॉडेल स्कूल, रिपब्लिक स्कूल, शासकीय आश्रम शाळा इतर शासकीय कार्यालय असून दररोज हजारो संख्येने रहदारी होत असते, अनेकदा अपघात होऊन शाळेकरी विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्याचे घटना घडलेले आहेत. तसेच या रस्तामुळे सर्वात जास्त भुर्दंड शाळेकरी विद्यार्थ्यांवर होत असुन त्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याने पालकांकडून ओरड सुरू आहे. मात्र याबाबतीत संबंधित बांधकाम विभाग कुंभकरणच्या झोपेत आहे.

*धुळीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य धोक्यात*
या रस्त्यावर एकलव्य मॉडेल स्कूल, रिपब्लिक स्कूल, शासकीय आश्रम शाळेमध्ये जाणारे हजारो लहान मोठे विद्यार्थी दररोज ये जा करित आहेत, मोठ – मोठे वाहनांची रहदारी होत असल्याने रस्ता पूर्णपणे दुरावस्था झालेला आहे, त्यामुळे सर्वत्र धूच धूळ पसरत आहे, धुळीमुळे अस्थमा, श्वास घेण्याकरीता लहान मुलांना त्रासामुळे पालकवर्ग त्रस्त झाले आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!