Homeनागपूरसोन्याच्या दागिन्यांची चोरी, 'झुंड'मध्ये बिग बींसोबत झळकलेल्या अभिनेत्याला अटक

सोन्याच्या दागिन्यांची चोरी, ‘झुंड’मध्ये बिग बींसोबत झळकलेल्या अभिनेत्याला अटक

नागपूर : सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरी केल्या प्रकरणी ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित या सिनेमात बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांच्यासोबत हा कलाकार झळकला होता. १८ वर्षीय प्रियांशू क्षत्रिय याला गुरुवारी नागपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रियांशूने ‘झुंड’ चित्रपटात बाबू ही व्यक्तिरेखा साकारली होती.

पोलिसांनी एका अल्पवयीन संशयिताला पकडले होते. त्याने या गुन्ह्यात प्रियांशू क्षत्रियचा सहभाग असल्याचा दावा केला. त्यानंतर मंगळवारी पोलिसांनी प्रियांशूला अटक केली, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रियांशू क्षत्रिय याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नागपुरातील गड्डीगोदाम परिसरात एका कबुतराच्या पेटीतून चोरीच्या वस्तू जप्त करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड सिनेमामध्ये हा परिसर दिसला आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रियांशू क्षत्रियला यापूर्वी रेल्वे प्रवाशांचे मोबाईल फोन चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!