आमदार सुभाष धोटेंच्या विकास प्रणालीवर विश्वास दर्शवून साईराज अलोने यांचा काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश

426

गोंडपिपरी:
धाबा दि.२५ नोव्हेंबर

सकमुर ते कुडे नांदगाव जोडणाऱ्या रस्त्याची मागणी (सडक) लवकरच मंजुर करण्याचे संकेत.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा तोहगाव जि.प. क्षेत्रांतर्गत येत असलेल्या सकमूर गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच साईराज अलोने यांनी क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या विकास कार्यप्रणालीवर विश्वास दर्शवून काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेश केला.

गावातील समाजकार्याकरिता, विविध विकास कामांकरिता सतत धडपडनारे सामाजिक कार्यकर्ते साईराज अलोणे हे या पूर्वी सुध्दा अनेक वर्ष काँग्रेस मध्येच काम केलेले होते. परंतु काही अक्षम्य विरोधी कार्यकर्त्यांच्या कोरड्या थापांनी ते चल बीचल झाले होते. मात्र क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांची विकास कामे करण्याची पराकाष्ठा बघून साईराज अलोने यांनी आज गावातीलच काही समाजकार्यात सहकार्य करणाऱ्या नागरिकांसह राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक व माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांची भेट घेऊन काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

सकमुर गावापासून शेत शिवारातून कुडे नांदगावला जोडणारा रस्ता ज्याचा टोला नांदगाव,चेक नांदगाव आणि हेटी नांदगाव या गावांना त्या गावांतील शेकडो शेतकऱ्यांना बैल बंडी, खते, बी बियाणे व शेतशिवारात जाण्याकरिता आणि त्या त्या गावातील रहदारी करणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने अत्यावश्यक असल्याने सदर रस्त्याची अडचण साईराज अलोने यांनी निवेदनातून मांडल्या. निवेदनाची दखल घेत सदर रस्त्याचे काम मंजूर करून त्या मार्गाची अडचण दूर करून शेतकऱ्यांना व नागरिकांना नक्कीच दिलासा देऊ अशी ग्वाही क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी निवेदक कार्यकर्त्यांना दिली.

दरम्यान गोंडपीपरी बाजार समिती माजी उपसभापती अशोक रेचनकर, पोडसा सरपंच तथा सरपंच संघटना अध्यक्ष देवीदास सातपुते, सकमुरचे माजी उपसरपंच साईराज अलोने,रमेश मुग्गलवार, पंकज खर्डीवार, माधव अलोने, विनोद जक्कुलवार यांची उपस्थिती होती.