Homeगडचिरोलीजि.प.उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे अमिर्झा बिटस्तरीय शिक्षण परीषद संपन्न

जि.प.उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे अमिर्झा बिटस्तरीय शिक्षण परीषद संपन्न

गडचिरोली :- दि 13 ऑक्टो ला अमिर्झा बिटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंजुळाताई पदा सरपंचा खुर्सा, उद्घघाटक श्री धनंजय साळवे गटविकास अधिकारी गडचिरोली, राजेश मंगर शा.व्य.स.अध्यक्ष, श्री मनोज उरकुडे तमुस अध्यक्ष ,विशेष अतिथी उकंडराव राउत गशिअ गडचिरोली पं.स., निखिल कुमरे शिक्षण विस्तारअधिकारी, प्रमुख पाहुणे प्रभाकर बारशिंगे केंद्र प्रमुख आंबेशिवनी,किशोर चव्हाण केंद्रप्रमुख अमिर्झा , चित्ररेखा खोब्रागडे केंद्र मुख्याध्यापक अमिर्झा , सुरेश बांबोळकर केंद्र मुख्याध्यापक आंबेशिवणी, कुमारी कल्पना लाडे फुलोरा तालुका समन्वयक गडचिरोली, उपस्थित होते.

कार्यक्रम सुरवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथील विध्यार्थ्यांच्या सुमधुर स्वागतगीताने झाली. उदघाट्न म्हणून लाभलेले मा. श्री धनंजय साळवे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मिशन नवचेतना, ज्ञानरचनावाद, फुलोरा या उपक्रमातुन गुणवंत्ता वाढते, याबद्दल, शिक्षकच चांगला विध्यार्थी घडवितो. त्यासाठी शिक्षकांनी सचोटीने विध्यार्थ्यांना शिकवावे, त्यांचप्रमाणे शाळेच्या वाचनालयामध्ये विध्यार्थामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन उपक्रम राबवावे, अशाप्रकारे मार्गदर्शन केले.

त्यानंतर मा. गटशिक्षणाधिकारी राऊत सर यांनी देशाचा विकास शिक्षण घेतल्याने होते याकरिता सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले पाहिजे यासाठी फूलोरा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.श्री निखिल कुमरे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी विघार्थी घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

अशा प्रकारे मार्गदर्शन केले.श्रीमती संगीता लाकडे, श्री प्रसाद श्रीरामे, श्री विनोद मडावी, श्री सागर आत्राम, श्री समीर भजे, श्री सुरेश बांबोळकर, श्रीमती कल्पना लाडे, श्री किशोर चव्हाण, श्री प्रभाकर बारशिंगे ज्ञानरचनावाद,अनुभवात्मक अध्ययन,खेळाधारीत अध्यापन व तंत्रज्ञान,स्वयंअध्ययन, फुलोरा कृतीयुक्त अध्ययन विषयनिहाय पाठाचे सादरीकरण केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर उईके, अविनाश येनप्रेडीवार, निवास कोडाप, जगन्नाथ हलामी,खुमेंद्र मेश्राम, अमोल जोशी,नूर पठाण, सचिन मेश्राम, आशिष बांबोळे,पायल गावंडे यांनी प्रयत्न केले.सुत्रसंचालन तथा आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथील मुख्याध्यापक श्री सुरेश वासलवार तसेच आभार श्री जगदिश मडावी यांनी केले.कार्यक्रमास अर्मीझा तसेच आंबेशिवणी केंद्रातील शंभर शिक्षक उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!