Homeनागपूरमानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य दिनानिमित्त 'सुकून' कार्यक्रमाचे आयोजन...

मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य दिनानिमित्त ‘सुकून’ कार्यक्रमाचे आयोजन…

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर, मानसशास्त्र विभागाच्या वतीने, जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येत आहे.
जागतिक मानसिक आरोग्य दिन निमित्त 10 ऑक्टोबर 2022 रोजी मानसशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘सुकून‘ (My well-being, my responsibility) या सर्वसमावेशक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

शारीरिकदृष्ट्या एखादी व्यक्ती तंदुरुस्त दिसत असेल तर आपण त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले आहे असे म्हणतो. परंतु ती व्यक्ती शरीराने मजबूत असेल म्हणजे त्या व्यक्तीचे आरोग्य चांगले आहे असे अजिबात नाही. कारण फक्त आपले शरीर म्हणजे आपले संपूर्ण आरोग्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या करत असतांना म्हटले आहे की, “आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे.” यावरून असे स्पष्ट होते की, आरोग्य म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक स्थिती सोबतच मानसिक, अध्यात्मिक आणि सामाजिक स्थिती व्यवस्थित असणे होय.

आरोग्य चांगले ठेवणे हे आपल्या हातात असते. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेत असतांना फक्त शरीराकडे लक्ष न देता मनाचा विचार करणे सुद्धा गरजेचे आहे. कारण शरीर मजबूत असेल परंतु मन कमकुवत होत असेल तर त्याला चांगले आरोग्य असे म्हणता येत नाही. त्यामुळे शरीरासोबत मनाचे संतुलन चांगले असणे आवश्यक आहे. कारण जसे शरीराचे दुखणे असते अगदी तसेच मनाचेही दुखणे असू शकते. आपल्याला आपल्या शरीराला झालेल्या इजा दिसून येतात परंतु मनाला झालेल्या इजा सहजासहजी दिसून येत नाही. त्यामुळे आज आपल्याला शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची काळजी घेणे तितकेच आवश्यक आहे.

आपण सर्व आपल्या शारीरिक आजाराची जशी काळजी घेतो त्याच प्रकारे मानसिक आजाराची सुद्धा तेवढीच काळजी घेणे गरजेचे असते. मानसिक आजार म्हणजे काय? ते कसे तयार होत असते? त्याची लक्षणे काय असतात आणि त्यावर केले जाणार उपाय इथे समजावून सांगितले जाणार आहेत. मानसिक आरोग्य स्वस्थ तर शारीरिक स्वस्थ, त्यामुळे आपल्या मानसिक आजाराला ओळखुन आणि समजून घेण्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी *जागतिक मानसिक आरोग्य दिन* साजरा केला जात आहे, या मध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी 14 वेगवेगळ्या प्रत्यक्ष क्रियेद्वारे समजावून सांगणार आहेत, यासोबतच विद्यार्थ्यांद्वारे ‘अस्तित्व‘ नावाचे अप्रतिम नुक्कड नाटक चे सादरीकरण होणार आहे. करिता आपण सर्वांनी 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी ठीक 11:00  वाजता नागपूर युनिव्हर्सिटी मानसशास्त्र विभाग, अमरावती रोड, नागपूर येथे उपस्थित राहून आपल्या मानसिक आजाराविषयी जागृत राहण्याचे आवाहन केले आहे .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!