Homeनागपूरमानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य दिन साजरा...

मानसशास्त्र विभागातर्फे मानसिक आरोग्य दिन साजरा…

 

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा संपादक

नागपूर,10 ऑक्टोबर 2022.

१० ऑक्टोबर “जागतिक मानसिक आरोग्य दिवस” या निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मानसशास्त्र विभागाने :सुकून : व्हेन माइंड इज ऍट पीस’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम देशाच्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या आणि विद्यापीठाच्या शंभराव्या वर्षाच्या उत्सवाचा एक भाग होता. कार्यक्रमाची थीम डब्ल्यू. एच.ओ च्या ‘वेल बिंग’ या थीम शी सुसंगत होती. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भरतनगर, रामनगर, रविनगर आणि अमरावती रोड मार्गे जनजागृती रॅली काढण्यात आली.

मानसिक आरोग्याविषयीचा स्टिग्मा दूर करण्यासाठी नुक्कड नाटकही सादर करण्यात आले. मुख्य कार्यक्रम 10 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता विद्यापीठ परिसरात संपन्न झाला. जेथे “माझे वेल बिंग, माझी जबाबदारी” या थीम अंतर्गत अनेक मजेदार आणि माहितीपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांकडून राबवण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रवेश सर्वांसाठी खुला होता.

या कार्यक्रमाला जवळपास १३००-१४०० लोकांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, मानसशास्त्रज्ञ आणि इतर अनेक व्यावसायिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सन्माननीय प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे आणि उद्घाटक मानव्यशास्त्र विभागाचे अध्यक्ष डॉ. श्यामराव कोराटी यांच्या हस्ते करण्यात आले सोबतच मानसशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सुबोध बन्सोड उपस्थित असून सर्वांनी मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थी आयोजन समितीतील एम. ए. द्वितीय वर्षातल्या विद्यार्थ्यांच्या मते ‘ मानसिक वेल बिंग ही शारीरिक वेल बिंग इतकेच महत्वाचे असते आणि आगामी मानसशास्त्रज्ञ या नात्याने त्याबद्दल जनजागृती करणे हे आमचे कर्तव्य आहे’

हा कार्यक्रम मानसशास्त्र विभाग, कॅनरा बँक,आणि इतर प्रायोजकांचा एक सहयोगी प्रयत्न होता. ज्यामुळे लोकांना आरोग्याविषयी मोकळेपणाने बोलता आले आणि त्यांच्या वेल बिंग विषयी अंतर्दृष्टी मिळवण्यात मदत झाली.

मानसिक आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे तसेच येणाऱ्या पिढीला मानसिक आरोग्य या संकल्पनेची ओळख व्हावी हा मुद्दा लक्षात घेऊन एनजीओ आणि नागपूर जवळील गावात जनजागृती संबंधी भेट देऊन या उपक्रमाचा समारोप होईल.

आपल्या समाजात मानसिक आरोग्य अजूनही कलंकित आहे आणि त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आपण सुजाण नागरिक या नात्याने आवश्यक जनजागृती केली पाहिजे आणि आपले मानसिक आरोग्य जपण्यासाठी आपण कार्यही केले पाहिजे. कारण “माझे वेल बिंग, माझी जबाबदारी!”

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!