-श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)
चंद्रपुर: संबोधन ट्रस्ट आणि सियोन बहुउद्देशीय समाज संस्था ही लोक कल्याणकारी हित जोपासणारी संस्था असून त्यांचे कार्य गोरगरीब कुटुंबांना आधार देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. त्यातच त्यांनी दिनांक 03 ऑक्टोंबर 2022 रोजी चंद्रपूर बसस्थानक परिसरातील पुलाजवळ असलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या, अत्यंत गरीब परिस्थितीत दिवस घालवत असलेल्या, राहायला साधे छत सुद्धा त्यांच्या नशिबी नाही अश्या परिस्थितीत दिवस घालवत त्या परिसरात राहणाऱ्या अत्यंत गरीब महिलांना नवरात्रीच्या पावन पर्वावर साड्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपस्थित महिलांनी संस्थेचे आभार मानले. तसेच संस्थेचे पदाधिकारी संबोधन ट्रस्टचे अध्यक्ष श्री.राज काचोले व सियोन बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष श्री.वैभव मोडकवार यांनी मोलाचे कार्य केल्याबद्दल बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे…