Homeचंद्रपूरम. गांधींच्या विचारधारेनेच देशातील अराजकता संपुष्टात येणार - आ. वडेट्टीवार...गांधी के रास्ते...

म. गांधींच्या विचारधारेनेच देशातील अराजकता संपुष्टात येणार – आ. वडेट्टीवार…गांधी के रास्ते पदयात्रेचा सावली येथे समारोप

सावली: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभे आयुष्य पणाला लावणारे खरे देशभक्त महात्मा गांधी हे होय. त्यांचे नीतिमूल्ये व मानवतावादी विचार आजच्या अराजक्तेच्या काळात प्रत्येकामध्ये रुजविणे काळाची गरज असून गुलामगिरीच्या खाईत लोटल्या जाणाऱ्या भारत देशाला पुन्हा स्वातंत्र्याचा लढा देण्यासाठी हर घर गांधी , घर घर गांधी असा नारा देऊन तत्पर राहावे. असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.ते प्रोफेशनल काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तिन दिवसीय आयोजित गांधी के रास्ते पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुन बोलत होते.

याप्रसंगी प्रामुख्याने गडचिरोली चे माजी आ. नामदेवराव उसेंडी,काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे ,चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू ) तिवारी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी जि. प.सभापती संदीप गड्डमवार, दिनेश चीटनूरवार, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा पदयात्रा प्रमुख मनीष तिवारी, इंटक नेते के. के. सिंग, हसन गिलानी, विश्वशांती दूत प्रकाश अर्जुनवार, सावली नगराध्यक्ष लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, हरिदास पाहुणकर, पोंभूर्णा काँग्रेस तालुकाध्यक्ष कवडू कुंदावार, तथा सावली नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते गांधी विचारधारेचे जेष्ठ नागरिक व इतर बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुढें आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत जहाल व मवाळ अशा दोन्हीही शस्त्रांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. गांधीजींच्या अहिंसावादी विचाराने देशातील स्पृश्य अस्पृश्य भेद व जातीय विषमता दूर झाली. त्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाच्या लढ्यातही गांधीजींचा मोलाचा वाटा होता. देशातच नव्हे तर विदेशातही गांधीजींचे विचार दूरवर पसरले असून याची अनुभूती विदेशातील गांधीजींचे उभे असलेले पुतळे यावरून येते. चंद्र आणि सूर्याप्रमाणेच गांधीजीचे विचारही अजरामर असून देशातील सध्याच्या स्थितीत सुधारणा घडविण्यासाठी गांधी विचारधारा काळाची गरज बनली आहे. असे आवाहन त्यांनी केले. यानंतर अनेक मान्यवरांनी गांधीजींच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. चंद्रपूर प्रोफेशनल काँग्रेस द्वारा आयोजित चंद्रपूर ते सावली या तीन दिवसीय गांधी के रास्ते पदयात्रा मधील सलग तीन दिवसीय सहभागी मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यानंतर गांधीजीच्या सावली येथील भेटींच्या स्मृतींची आठवण करत चरखा संघातील विणकाम यंत्र व भूतकाळातील चरखा याची पाहणी करून गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरखा संघ सावली भूमीच्या इतिहासासाठी चरखा संघ परिसराच्या विकासाबाबत विसरून चर्चा करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने सावली चंद्रपूर गडचिरोली व परिसरातील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहने, प्रास्ताविक जिल्हा प्रोफेशनल काँग्रेस चंद्रपूर अध्यक्ष मनीष तिवारी ,तर पदयात्रेत सहभागी सिंदेवाही नगरपंचायत नगरसेवक युनूस शेख यांनी मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!