Homeचंद्रपूरप्रतिभावान नारीशक्ती म्हणून रोशनी ताई खान...नवभारत-नवराष्ट्र तर्फे महिलांचा आदर सन्मानाचा सोहळा..

प्रतिभावान नारीशक्ती म्हणून रोशनी ताई खान…नवभारत-नवराष्ट्र तर्फे महिलांचा आदर सन्मानाचा सोहळा..

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)

चंद्रपुर: जिल्हा परिषद चंद्रपूरच्या माजी महिला व बालविकास सभापती रोशनी ताई खान या नेहमीच लोकांच्या हाकेला हाक देणाऱ्या आहेत.. त्यांचे जनहितार्थ कार्य नेहमीच जनतेच्या मनात घर करुन राहत आहे. त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्यामुळे त्या खूप लोकप्रिय झाल्या. इथेच न थांबता एक यशस्वी शिक्षिका ते जिल्हा परिषदच्या महिला बाल कल्याण सभापती पदावर मुस्लिम समाजातील एकमेव महिला सभापती म्हणून नावलौकिक मिळवून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला.

या सर्व गोष्टींची नवभारत-नवराष्ट्र या वृत्तपत्राने दखल घेतल्याने प्रतिभावान नारीशक्ती म्हणून त्यांची ओळख चंद्रपूर जिल्ह्यात झालेली आहे. पर्यावरण क्षेत्रात मास्टर डिग्री,इंग्रजी साहित्य, मास्टर डिग्री, बॅचलर ऑफ एज्युकेशन डिग्री आणि आज प्रोफेसर या पदावर उतूंग भरारी गाठणाऱ्या रोशनी ताई खान या लोकांच्या गळ्यातल्या ताईत बनलेल्या आहेत.

समाज कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या आणि जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा सिनालाच्या शाळेचा कायापालट करून त्यांनी शाळेला अनेक भेटवस्तू देत आपल्या पदाचा योग्य वापर करून महिलांमध्ये एक आदर्श निर्माण केला आहे. इथपर्यंतच त्या थांबल्या नाही तर शाळेच्या विद्यार्थ्यां प्रती असलेले त्यांचे प्रेम ते पण त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच…

विद्यार्थ्यांकरिता बस उपलब्ध करून नवीन सिनाळा पुनर्वसन स्थळी शाळेची इमारत बांधकाम करण्याकरिता त्यांनी सतत पाठपुरावा करून आपल्या कार्याची पावती जनतेला देत पॉवरफुल वूमेन समीट-२०२२ म्हणून नावलौकिक मिळविला आहे. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!