Home चंद्रपूर आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण मनात शिकण्याची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांना अमर बोडलावार यांची मदत…...

आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण मनात शिकण्याची जिद्द असलेल्या विद्यार्थ्यांना अमर बोडलावार यांची मदत… विद्यार्थ्यांना केली शालेय गणवेष व पूस्तकांची मदत…

664

चंद्रपुर: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत न्यू दान पब्लिक स्कूल, चंद्रपूर येथे शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना भाजपा पदाधिकारी अमर बोडलावार यांनी शैक्षणिक मदत केली.

न्यू दान पब्लिक स्कूल, चंद्रपूरचे विद्यार्थी असलेले रेहानअली वर्ग 10 आणि वजित अली वर्ग 8 वा हे गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव रहिवासी असून यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची आहे पण मनात शिकण्याची जिद्द असल्याने त्यांना शालेय गणवेष व शालेय पूस्तकांची मदत हवी होती.

ही बाब इंडिया दस्तक न्यूज टीव्हीचे मुख्य संपादक मुन्ना तावाडे यांना माहिती झाली. विद्यार्थ्यांची गरज ओळखुन तावाडे यांनी तात्काळ ही माहिती माजी जि.प.सदस्य अमर बोडलावार यांना दिली. बोडलावार हे विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसावले व त्यांना शालेय गणवेष आणि आवश्यक ती पूस्तक देऊन त्यांची गरज पूर्ण केली.

Don`t copy text!