Homeचंद्रपूरचंद्रपुर शहरात गणेश विसर्जन धुमधडाक्यात संपन्न... परंतु?

चंद्रपुर शहरात गणेश विसर्जन धुमधडाक्यात संपन्न… परंतु?

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)

चंद्रपूर: चंद्रपूर शहरात गणेश विसर्जन धूम धडाक्यात संपन्न झाले. गणेश विसर्जनासाठी पोलिसांचा शहरात जागोजागी चोख बंदोबस्त पाहायला मिळाला. परंतु गणेश विसर्जनातील काही बाबी इंडिया दत्तक न्यूज टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाल्या.

आझाद बगीच्या जवळ गंज वॉर्डच्या दिशेने दुपारच्या सुमारास तीन रुग्णवाहिका आल्या. जवळपास पाच ते सात मिनिटे सायरन वाजत होते. परंतु तो रोड ब्यारिकेट्स लावून बंद करण्यात आला होता. तिथे काही वाहतूक पोलीस उपस्थित असूनही पाच ते सात मिनिटे ही बाब त्यांच्या लक्षात आली नाही. त्यामुळे जीवितहानी होण्याची भीती नाकारता आली नाही.

इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चे जिल्हा संपादक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल मध्ये कैद केला. त्यातच विसर्जनाच्या वेळी सर्वात जास्त त्रास झाला असेल तर तो रुग्ण वाहिकेला झाला. एक रुग्णवाहिका गांधी चौक इथे तर दुसरी बँक ऑफ इंडिया, तिसरी छोटा बाजार आणि चौक चौथी जेटपुरा गेट या परिसरात रुग्ण वाहीकेला खूप त्रास सहन करावा लागला.

अश्या परिस्थितीत कोणतीही घटना घडू शकते. परंतु गणेश भक्तांनी व उपस्थित पोलीस कर्मचारी यांनी रस्ता मोकळा करून देण्याचे काम केले. अशा वेळेस प्रशासनाने नियोजन करून रुग्ण सेवा ही खूप महत्त्वाची असते ही बाब लक्षात घेऊन येणाऱ्या काळात रुग्ण वाहिकेकरिता छोटा बाजार चौक इथून मार्ग मोकळा करून दिल्यास थेट सामान्य रुग्णालय इथे लवकरात लवकर पोहचू शकेल.

कस्तुरबा गांधी मार्गाने जात असता भूमिगत गटार चे झाकण फुटलेल्या अवस्थेत होते. त्या ठिकाणी एका महिलेच्या पायाला दुखापत झाली.त्या ठिकाणी महानगपालिकेतर्फे पूर्व नियोजन करायला पाहिजे होते. काही गणेश मंडळात महिलांचा विशेष सहभाग होता. तर आझाद गार्डन परिसरात चंद्रपूरच्या राजाचे आगमन होताच अलोट गर्दी जमा झाली होती. गांधी चौक ते जेटपुरा गेट रोड इथे विशेष ड्रोन कॅमेरा फिरत होता. सर्व गणेश मंडळाचे पोलीस विभागाला सहकार्य मिळत गेले. अश्या पद्धतीने दहा दिवसाच्या विश्रांती नंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!