प्रेमभंग झाल्याच्या रागात प्रेयसीच्या भावाचे अपहरण करुन केला खून…आरोपीना पोलिसांनी केली अटक..

1463

ब्युरोचिफ प्रशांत शाहा

पिंपरी : प्रेमभंगाचा राग अनावर झालेल्या तरुणाने प्रेयसीच्या भावाचेच अपहरण करून खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. या प्रकरणी गुंडा विरोधी पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

तसेच, २० कोटींची खंडणी मागून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाला असे पोलिसांनी सांगितले. आदित्य आगले (वय सात वर्षे) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी मंथन किरण भोसले आणि अनिकेत समदूर यांना अटक करण्यात आली आहे. आदित्य चा मृतदेह रात्री भोसरी MIDC परिसरात आढळून आला आहे.

गुरुवार पासून आदित्य बेपत्ता होता. त्याचा शोध कुटुंबीय घेत होते. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मंथन किरण भोसले हा मयत आदित्यच्या सोसायटीत राहण्यास आहे. त्याचे आणि आदित्यच्या बहिणीवर आरोपी मंथनचे एकत प्रेम होते असे पोलिसांनी सांगितले. परंतु, त्यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध होता. यावरून भांडण देखील झाले, या सर्व घटनेमुळे मंथनच्या डोक्यावर परिणाम झाला तो दोन वर्षे शिक्षणापासून वंचित राहिला. नको त्या गोष्टी करायला लागला. आगले कुटुंबाला अद्दल घडवायची या उद्देशाने प्रेमभंग झालेल्या मंथनने आदित्यचे अपहरण करायचे अस ठवरले.

तसा त्याने मित्राच्या मदतीने कट रचला. अपहरण करण्यासाठी चारचाकी गाडीला काळी फिल्म लावण्यात आली. गुरुवारी संध्याकाळी आदित्य सोसायटीच्या खाली खेळण्यास आला ,तेव्हा मित्राला त्याला गाडी जवळ बोलावण्यास सांगितले. आदित्यला गाडी जवळ येताच आत घेऊन त्याच नाक आणि तोंड दाबून जागीच ठार केले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी आदित्यच्या कुटुंबियांच्या व्हाट्सएपवर २० कोटींची खंडणी मागण्यात आली. परंतु, अवघ्या काही तासातच आरोपीपर्यंत पोहचत गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने यांच्या पथकाने आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.