Homeचंद्रपूरगोंडपिंपरीगोंडपिपरी- धाबा- पोडसा बस सेवा तात्काळ सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा...आमदार सुभाषभाऊ...

गोंडपिपरी- धाबा- पोडसा बस सेवा तात्काळ सुरू करा, अन्यथा आंदोलनाचा इशारा…आमदार सुभाषभाऊ धोटे यांची परिवहन वाहतूक नियंत्रक विभागाकडे पत्राद्वारे मागणी…

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी:- राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी तालुक्यात धाबा ते पोडसा मार्गावरील सुरू असलेली बस सेवा अनेक महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे त्या परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
सदर प्रकरणी बस सेवा सुरू करणे संबंधाने यापूर्वीसुद्धा आमदार साहेबांनी मौखिक सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सुद्धा बस सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोडपिपरी धाबा पोडसा मार्गे तात्काळ बस सेवा सुरू करावी अन्यथा परिसरातील विद्यार्थी व नागरिकांसह आठवडाभरात आंदोलन केल्या जाईल,असा इशारा आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी परिवहन वाहतूक नियंत्रक विभागात पत्राद्वारे दिलेला आहेत.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!