Homeसामाजिक हृदयाला छिद्र अश्या दूर्धर आजारग्रस्त "निरागस बालकांना' मिळणार नवीसंजीवनी.. १...

हृदयाला छिद्र अश्या दूर्धर आजारग्रस्त “निरागस बालकांना’ मिळणार नवीसंजीवनी.. १ ते १० वयोगटातील बालकांची मुंबईत होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया.. माजी मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांचा पुढाकार..

आजच्या धकाधकीच्या काळात रासायनिक प्रक्रियेतून उत्पन्न झालेले अन्न पदार्थांचे सेवन, वातावरणातील बदल, ग्लोबल वॉर्मिग याचा मनुष्य जीवनावर प्रचंड प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे. यामुळे वयस्क व्यक्तींसह, बालकांमध्येही आरोग्याच्या तक्रारींचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यात जन्मताच हृदयाला छिद्र (ASD-VSD) या हृदया संबंधि दुर्धर आजाराने अनेक बालके ग्रस्त आहेत. तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, महागडा उपचार तद्वतच मोठ्या शहरात राहून उपचार करून घेण्यास येणाऱ्या अडचणी हे ग्रामीण पातळीवरील रुग्ण नातेवाईकांना परवडण्यासारखे नाही. याची माहिती मिळताच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १ ते १० या वयोगटातील हृदय संबंधी आजारग्रस्त बालकांची जुपिटर हॉस्पिटल ठाणे (मुंबई) येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.

राज्याच्या सीमावर्ती भागातील औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर तर नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, आदिवासी बहुल जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. सदर दोन्ही जिल्ह्यात राज्य शासनाची आरोग्य यंत्रणा काम करीत असली तरीही दुर्धर आजारांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशातच रासायनिक खतांद्वारे उत्पन्नातून निर्माण झालेले अन्नपदार्थ, वातावरणातील बदल, अनुवंशिकता यामुळे निरनिराळ्या रोगाचे निदान समोर आले आहे. तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १ ते १० या वयोगटातील बालकांची हृदयाला छिद्र (ASD-VSD)असे हृदयासंबंधीचे दुर्धर आजाराचे वाढते प्रमाणांची माहिती राज्याची माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, आ. विजय वडेट्टीवार यांना कळतात अशा गंभीर आजारग्रस्त बालकांची हृदय शस्त्रक्रिया ठाणे (मुंबई) शहरातील जुपिटर हॉस्पिटल मोठ्या रुग्णालयात मोफत करण्यासाठी आ. विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेतला असून राबविण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया उपक्रमात आजारग्रस्त रुग्ण व सोबत एक नातेवाईक यांना मुंबई गाठण्यासाठी विमान प्रवास , राहण्याची व्यवस्था , शस्त्रक्रिया व उपचार खर्च, या सर्व सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहे.या मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ घेण्यासाठी माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांचे जनसंपर्क कार्यालय ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली येथे २२ सप्टेंबर २०२२ या तारखेपर्यंत रुग्णा संबंधीची परिपूर्ण माहिती व कागदपत्रे जमा करून शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. दिनांक २५ सप्टेंबर २०२२ रविवार रोजी सहभागी रुग्णांची पूर्व तपासणी जुपिटर हॉस्पिटल मुंबई येथे करण्यात येणार आहे. आयोजित हृदय शस्त्रक्रिया शिबिराचा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी ७६२०७३५४६० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!