Homeचंद्रपूरगोंडपिंपरीविज्ञान प्रदर्शनीला भेट देऊन आमदार सुभाष धोटेंनी वाढविला विद्यार्थ्यांचा उत्साह. प....

विज्ञान प्रदर्शनीला भेट देऊन आमदार सुभाष धोटेंनी वाढविला विद्यार्थ्यांचा उत्साह. प. स. गोंडपिपरी द्वारा ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन.

शरद कुकुडकार भंगाराम तळोधी (प्रतिनीधी)

गोंडपिपरी :– पंचायत समिती गोंडपिपरी द्वारा जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय गोंडपिपरी येथे ४९ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले असून लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी या प्रदर्शनीला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला, त्यांच्या विविध आविष्कारांचे, प्रयोगांचे निरीक्षण केले, माहिती जाणून घेतली. त्यामुळे प्रदर्शनीत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला.

या प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशा संधी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होतो. त्यांच्या तर्कशक्तीला, स्वप्नांना प्रोत्साहन मिळते. कोरोना काळात विद्यार्थी अशा प्रकारच्या कृतीशिल उपक्रमांपासून दूर होते मात्र आता अशा अधिक संधी त्यांना मिळायला हव्यात असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संवर्ग विकास अधिकारी गजानन मुंडकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, बांधकाम सभापती न. प. सुरेश चिलनकर, नगरसेवक अनिल झाडे, राकेश पुन, शारदा गरपल्लीवार, जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य बी.के. दुर्गे, उपमुख्याध्यापक संजय पठाण, विद्यार्थी, शिक्षक वृंद उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!