Homeचंद्रपूरमहाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे ) समाज महासंघ अंतर्गत " महासंघ सुतार...

महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे ) समाज महासंघ अंतर्गत ” महासंघ सुतार (झाडे) सखी मंच व महासंघ सुतार (झाडे) युवा मंच वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन…

चंद्रपुर: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित “महाराष्ट्र विश्वकर्मा मय सुतार (झाडे ) समाज महासंघ अंतर्गत ” महासंघ सुतार (झाडे) सखी मंच व महासंघ सुतार (झाडे) युवा मंच “च्या वतीने रविवार, दिनांक २८ ऑगष्ट २०२२ ला “राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा, सुतार  कारागिरी विषयक रोजगार मार्गदर्शन, निबंध स्पर्धा, समाज ज्येष्ठांचा सेवाभुषण सत्कार-२०२२ चे एकदिवसीय आयोजन “राजीव गांधी सभागृह, जयंत टॉकीज जवळ, मेन रोड, चंद्रपूर” येथे करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमाचा उद्‌घाटन सोहळा उद्‌घाटक श्री. संजयजी आ. परसुटकर (अधिक्षक, जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वासुदेवरावजी वांढरे पोलीस उपअधिक्षक (सेवानिवृत) महाराष्ट्र पोलीस, नागपूर आणि विशेष प्रमुख अतिथी म्हणून सौ. हर्षाताई कि. साखरकर अध्यक्षा, सुतार सखी मंच , नागपूर व श्री. सुरज भा. वनकर  प्रो.प्रा. भुमि एम्पायर बिझिनेस प्रा. लि. चंद्रपूर आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात श्री. नरेंद्र वनकर अध्यक्ष, म.वि.म.सु. स महासंघ यांचे हस्ते महासंघ ध्वजारोहण सकाळी ९.30 वाजता, सामुहिक राष्ट्रगीत गायन सकाळी ९.४० प्रभु विश्वकर्मा प्रतिमा/ मुर्तीचे शास्त्रोक्त पुजन श्री महेश शास्त्रकार अध्यक्ष म. सु. (झाडे) स. चंद्रपूर यांचे हस्ते होईल. सोबतच दिपप्रज्वलन श्री. रविंद्रजी बुरडकर अध्यक्ष म. सु. (झाडे) यु. मं व सौ. माधुरीताई शास्त्रकार अध्यक्षा  म.सु.स .मं  करतील. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देशभक्ती गीत गायन, श्रद्धांजली, महासंघ सुतार  (झाडे) सेवाभुषण पुरस्कार – २०२२ (मरणोत्तर व विद्यमान), सुतार कारागिरी विषयक रोजगार मार्गदर्शन, स्नेहभोजन, निबंध स्पर्धा , शैक्षणिक गुणगौरव / सेवाभुषण सत्कार / बक्षीस वितरण, देशभक्ती गीतगायन / सांस्कृतिक कार्यक्रम अनुक्रमे पार पडणार,तरी समाज बांधवांनी बहुसंख्येत व सहपरिवार सामील होऊन कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करावा असे आवाहन  महासंघ सुतार (झाडे) युवा मंच चे सदस्य देवा बुरडकर यांचे वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!