Homeचंद्रपूरजिवतीनैसर्गिक आत्तीमुळे शेतकरी पुन्हा संकटात... शेतकऱ्यांच्या व्यथा कोणी जाणून घेतील काय?

नैसर्गिक आत्तीमुळे शेतकरी पुन्हा संकटात… शेतकऱ्यांच्या व्यथा कोणी जाणून घेतील काय?

बळीराम काळे/जिवती

जिवती(ता.प्र):तालुक्यातील मागील पेरणीच्या एक महिन्याच्या सुरवातीपासून सतत पडणाऱ्या पावसाने थैमान घातले आहे.यामुळे कापूस,ज्वारी,सोयाबीन, तूर,बाजरी इत्यादी पिकात काही ठिकाणी पाणी साचले आहे.मोठ्या प्रमाणात पिकांना हानी देखील पोहचली आहे.ही पीक पाहून माणिकगड पहाडवरील शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी तरळत आहे.
नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळेल का,असा ज्वलंत प्रश्न शेतकरीवर्गामधून उपस्थित केला जातो आहे.
माणिकगड पहाडावरील शेतकऱ्यांना सतत कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा काही शेतकऱ्यांनी सोयाबिनला प्राधान्य दिले,तर काहीनी दरवर्षीप्रमाणे सर्व पिकांची पेरणी केली.पीक कापणीला आले असताना तोंडाला आलेला घास सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे हिरवतो की काय.पुन्हा आम्ही कर्ज बाजारी होणार की काय,
या भीतीपोटी शेतकरी बांधवांची झोपच उडाली आहे.
सततच्या रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे कापसाला लागलेले बोंड, चाफा गळून पडत आहे सोयाबीन पूर्णतः काळे पडले आहे. ज्वारी, तुर,बाजरी कणसे काळी पडत आहे.
शेतकऱ्यांची पीक पूर्णतः वाया गेल्याचे चित्र माराईपाटण, वाडिगुडा, राहापल्ली,येल्लापुर, टेकामांडवा, बुद्धगुडा,येरवा,लखमपुर,हिमायतनगर,शेडवही,लांबोरी,
गुदशेला,परमडोली,कोठा,भारी,शेडवाही, शेणगाव,या शिवारात दिसून येत आहे.हे चित्र वरील गावातच नाही तर माणिकगड पहाडावरील सर्वच गावातील अतिओलावा शेतकऱ्यांच्या शेतात दिसून येत आहे.
जिवती तालुक्यातील व परिसरातील शेतकरी वर्ग पुन्हा अतीपावसमुळे व अतिृष्टीमुळे संकटात सापडला आहे असे चित्र निर्माण झाले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!