Homeगोंडपीपरीरा.काँ. विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी तन्मयी गायकवाड

रा.काँ. विद्यार्थी तालुका अध्यक्षपदी तन्मयी गायकवाड

गोंडपिपरी :-  गोंडपिपरी येथील चिंतामणी कॉलेज येथे बीएससी कम्प्युटर द्वितीय वर्षात शिकत असलेल्या कु.तन्मय गायकवाड हीची राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी च्या गोंडपीपरी तालुकाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. सदर नियुक्ती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुजित उपरे यांनी केली.यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष नितीन भटाकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य राष्ट्रवादी सामाजिक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील देगावकर सामाजिक सेलचे जिल्हाध्यक्ष प्रियदर्शन इंगळे राजुरा विधानसभा अध्यक्ष कुणाल गायकवाड उपस्थित होते.

विद्यार्थी दशेपासून तन्मयी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून विद्यार्थ्यांच्या समस्यांसाठी त्या सतत संघर्ष करीत आल्या आहेत.त्यांच्यातील संघर्षमय कार्याची दखल जिल्हा राकॅ। विद्यार्थी च्या पदाधिकाऱ्यांनी घेत त्यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यांचे नियुक्तीने तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या समस्या निस्तारन्याचा प्रयत्न होणार असून त्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे.त्यांचे नियुक्तीने गोंडपीपरी तालुक्यातील विद्यार्थी संघटना,राजकीय कार्यकर्त्यांनी स्वागत व अभिनंदन केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!