शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा अपघात.. अनेक विद्यार्थ्यांना गंभीर जखमी…

1549

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

गडचिरोली:- शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या अहेरी आगारातील एसटी महामंडळाच्या बसला अपघात झाला असून या अपघातातवाहकासह शालेय विद्यार्थी गंभीर झाले आहे. शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी म्हणून मानव विकास मिशन अंतर्गत बसेस चालविले जातात.

मुलचेरा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अहेरी आगारातून जवळपास 4 ते 5 बसेस चालविले जातात. आज सकाळच्या सुमारास अहेरी – लगाम-मुलचेरा जाणारी एमएच-07 सी-9465 क्रमांकाची एसटी बस लगाम परिसरातील शांतिग्राम, लगाम,कोलपल्ली, कोठारी,मल्लेरा येथून शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना चाची नाल्याजवळ अपघात झाला.

या बसमध्ये जवळपास २० ते २५ शालेय विद्यार्थी असल्याची माहिती आहे. मल्लेरा गाव ओलांडल्यानंतर चाची नाल्याजवळ रस्त्याच्या कडेला थेट जंगलात जाऊन झाडाला आदळली. या अपघातात वाहन चालक आणि वाहक तसेच काही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व जखमींना मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात हलविल्याची माहिती आहे.