Homeचंद्रपूरब्रम्हपुरीपूरग्रस्तांची व्यथा जाणण्यासाठी आ. वडेट्टीवार थेट शेतकऱ्याच्या बांधावर...तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश

पूरग्रस्तांची व्यथा जाणण्यासाठी आ. वडेट्टीवार थेट शेतकऱ्याच्या बांधावर…तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश

यंदाचे वर्षी अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात वाढ होऊन गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.यामुळे वैनगंगेला पूर आल्याने नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेतातील धानपीक, सोयाबीन, तुर व इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांची व्यथा जाण्यासाठी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील किन्ही, रूई, निलज, गांगलवाडी शेतशिवारातील शेतांच्या बांधावर जात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश उपस्थित अधिका-यांना दिले.

यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री,काँग्रेस नेते तथा आ.विजय वडेट्टीवार म्हणाले की, ब्रम्हपुरी तालुक्यात २५ हजार हेक्टर जमीनीवर धान पिकाची लागवड केली आहे. त्यापैकी १८ हजार हेक्टर वरील धानपिकाचे नुकसान झाले आहे. शिंदे -फडणवीस सरकारने पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना महागाईच्या काळात हेक्टरी केवळ १३हजार ६०० रुपये एवढा नाममात्र मदतीचा हात देऊन ३ हेक्टर ची मर्यादा ठेवत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
मागील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देताना हेक्टरी १५ हजार रुपये मदत दिली होती. यंदाच्या वर्षी ब्रम्हपुरी तालुक्यात तिसऱ्यांदा पूर स्थिती उद्भवली आहे. पूराच्या पाण्यामुळे शेतातील संपूर्ण धान पीक नष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी शेती पिकविण्यासाठी घेतलेले सोसायट्यांचे पीक कर्ज कसे भरायचे असाही प्रश्न शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला आहे. पुराच्या पाण्याखाली शेती आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचे पूर्णतः नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करून, महागाईच्या काळात बियाणे, खते, कीटकनाशके, तणनाशके, ट्रॅक्टर भाडे आदी. महाग झाल्यामुळे महागाईच्या काळात पुरामुळे नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना एकरी कमीत कमी १५ हजार रुपये अशी सरकारकडून भरीव मदत मिळावी, पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामात लागवडी साठी शासनाकडून मोफत बी – बियाणे देण्यात यावे, आदी मागण्या आपण सरकारकडे करणार असल्याची माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी पार पडलेल्या उपस्थित पत्रकारांना दिली.

यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सदस्य प्रा.राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, माजी पं.स. सदस्य थानेश्वर कायरकर, नगरपरिषदेचे गटनेता विलास विखार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, यांसह काॅंग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!