प्रलय म्हशाखेत्री (जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर)
डॉ. सुनिल पांडुरंगजी झाडे यांची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे समाजकार्य अभ्यास मंडळावरती अविरोध निवड करण्यात आली आहे. डॉ. सुनिल पांडुरंगजी झाडे हे मूळचे तुळजापूर (वघाळा), जि. वर्धा येथील शेतकरी कुटुंबातील असून १९९४ पासून ते आठवले समाजकार्य महाविद्यालय, चिमूर, जि. चंद्रपूर येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. काही काळ ते कार्यकारी प्राचार्य म्हणून २००२-०८ व सध्या उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहे.
महाराष्ट्र राज्य स्तरावरती त्यांनी शिक्षण विभागाचे उपाध्यक्ष म्हणून सुद्धा स्थान भूषविले होते. तसेच ते सध्या महाराष्ट्र सोशल वर्क एज्युकेटर्स अँड स्टाॅफ फोरम यांचे सचिव आहे तसेच देशपातळीवरील प्रोफेशनल सोशल वर्क अँड एज्युकेशन फेडरेशन नागपूर या संस्थेचे ते सहसचिव आहेत. त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ग्रामशिक्षण समिती जी ग्रामपंचायत स्तरावरती असते अशा समितीला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रशिक्षण व मार्गदर्शन सुद्धा दिले.
त्यांनी *”महाराष्ट्रातील १९७० नंतरची शेतकरी चळवळ”* यावरती संशोधन करून संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून पि.एच.डी. प्राप्त केली आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य पातळीवरती २५ पेक्षा जास्त संशोधन पेपर प्रसिद्ध झालेले आहे.
*नुकतीच त्यांची “गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली” येथे समाजकार्य अभ्यास मंडळावरती [महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी कायदा २०१६ – कलम ४०(२) C] अविरोध निवड झालेली आहे.*
समाजकार्य अभ्यास मंडळाद्वारे विद्यापीठात नवीन पदव्या सुरू करणे, अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी शिफारस करणे, पुस्तक व ग्रंथ यांचा समावेश करणे, उद्योगाच्या किंवा समाजाच्या आवश्यक बाबी जाणून घेऊन आणि काळाची गरज ओळखून अध्यापन – अध्ययन प्रक्रिया सुसंबद्ध ठेवण्यासाठी या आवश्यक बाबींचा समावेश करणे. अध्यापक किंवा तज्ञाच्या मान्यते बाबतच्या शिफारस यांचे अनुसमर्थान करणे.
त्यांचे डॉ. चंदनसिंग रोटेले, संस्थापक अध्यक्ष आठवले समाजकार्य महा. चिमूर तसेच डॉ. अंबादास मोहिते, संस्थापक अध्यक्ष मास्वे व इतर मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. त्यांच्या या यशात त्यांची आई श्रीमती नानिबाई झाडे, श्रीमती प्रेमिलाताई दाताळकर (ताई), त्यांचे मोठे भाऊ श्री. अनिल झाडे (सेवानिवृत्त लेबर कमिशनर, भारत सरकार); श्री. माणिक झाडे (सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक, महाराष्ट्र राज्य) तसेच पत्नी सौ. जयश्री झाडे (तालुका मलेरिया पर्यवेक्षक) व परिवारातील इतर सदस्य यांचे मोठे योगदान आहे.






