श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपुर)
चंद्रपुर: जुलै-आगस्ट महिन्याच्या संततधार पाऊस सुरूच होता. त्यामुळे नदी, नाल्याना पूर आला, पुराचे पाणी शेतशिवारात शिरल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान ऑगस्टमध्ये तीन – चार दिवस सुरुवातीला पावसाने उसंत दिली. त्यामुळे शेतकरी पुन्हा शेतीच्या कामाला लागले होते. परंतु काही दिवसाच्या उसंतीनंतर जिल्हात रात्रभर अतिवृष्टीचा पाऊस झाला. जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना पूर येऊन शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाने प्रशासनाला पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकर्यामधून जोर धरत आहे.
अतिवृष्टीच्या पावसामुळे अरुणावती व पूस नदी व नाल्या लगताच्या शेतशिवारात पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. आधीच संपूर्ण जुलै-आगस्ट महिन्यात आलेल्या संततधार पावसाने हजारो हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मुंग पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आता दुबार पेरणीची वेळही निघून गेल्यामुळे शेतकरी पिक नुकसान व पिक विमा भरपाईची मागणी माय – बाप सरकारकडे करीत आहे. बाधित शेतकरी नुकसान भरपाईच्या आशेत अधिक पर्जन्यमान झाल्याने शेतामधील पिकात पाणी साचले आहे. यामुळे पिके खराब झाली असून, शेतकर्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शासनाने प्रशासन व विमा कंपनीला पिक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, तसेच जिल्हा हा दुष्काळ ग्रस्त जाहीर करून दुष्काळी सवलत लागू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.






