Home गडचिरोली गडचिरोली नगरात कृष्णा जन्माष्टमी निमित्याने दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा…

गडचिरोली नगरात कृष्णा जन्माष्टमी निमित्याने दहीहंडी उत्सव जल्लोषात साजरा…

798

नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा संपादक)

गडचिरोली: विश्व हिंदु परिषद,बजरंग दल नगर गडचिरोली व श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा जन्माष्टमी व विश्व हिंदू परिषद स्थापना दिवासंमित्याने दहिहंडी उत्सव कार्यक्रम स्थानिक अभिनव लॉन येथील प्रांगणात संपन्न झाला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन गडचिरोली पोलीस उपविभागीय अधिकारी मा. गील्डा साहेब,भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे,गडचिरोली नप मुख्याधिकारी विशाल वाघ,विश्व हिंदु परिषद सामाजिक समरसता चंद्रपूर विभाग रामायणजी खटी,प्रमुख वक्ते म्हणून प्रा.विवेकजी सरपटवार, गजाननजी डोंगरे,विश्व हिंदू परिषद नगर अध्यक्ष नितेश खडसे,नप माजी उपाध्यक्ष अनील कुनघाडकर,विश्व हिंदु परिषद दुर्गावाहिनी नगर कार्यकर्त्या तिलोतमा हाजरा,उपस्थित होते.
तत्पुर्वी सर्वोदय वार्ड येथील राममंदिर येथुन रॅलीला सुरवात करण्यात आली व अभिनव लॉन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने गोविंदा,भाविक आणि नागरिक उपस्थित होते. स्थानिक सभिनाव लॉन मध्ये नागरिकांनी प्रचंड गर्दी केलेली होती भगवान श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या नामाने संपूर्ण परिसर दुमदुमला आणि एक उत्साही वातावरन निर्माण झालेला होता.
दहीहंडी स्पर्धेमध्ये एकूण सात संघ सहभागी झाले होते.यामध्ये आयटीया चौक सोनापूर कॉम्लेक्स या संघाने दहीहंडी फोडून विजय प्राप्त केला.विजयी संघाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह बक्षीस देवुन सन्मानित करण्यात आले.
दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन विश्व हिंदु परिषद, बजरंग दल नगर गडचिरोली व श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती गडचिरोली यांनी केले.

Don`t copy text!