Home गडचिरोली गडचिरोली पोलीस दलाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

गडचिरोली पोलीस दलाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

672

गडचिरोली – जिल्हा पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या कार्याची दखल घेऊन नुकताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘आयएसीपी’, व्हर्जिनीया युनिव्हर्सिटी (इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलिस)चा लीडरशिप इन कम्युनिटी पोलिसिंग हा अवॉर्ड घोषित करण्यात आला आहे.

गडचिरोली पोलिस दलाच्या पोलिस दादालोरा खिडकीच्या वतीने पोलिस अधीक्षक अंकित गोयल हा सन्मान स्वीकारणार आहेत.

हा अवॉर्ड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मागास घटकांसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था व व्यक्तींसाठी दिला जातो. गडचिरोली पोलिस दलाने जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील वृद्ध, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी, बेरोजगार युवक-युवती, आत्मसमर्पित, नक्षलपीडित तसेच आदिवासी नागरिकांच्या विकासाबाबत गांभीर्याने विचार करून गडचिरोली पोलिस दलाच्या नागरी कृती शाखेअंतर्गत पोलिस स्टेशन/उपपोलिस स्टेशन व पोलिस मदत केंद्राच्या ५३ ठिकाणी पोलिस दादालोरा खिडकी सुरू केल्या आहेत. याअंतर्गत विविध उपक्रमांच्या माध्यमातून दुर्गम व नक्षलग्रस्त भागापर्यंत पोहोचून दोन लाखांच्या वर नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, अंमलदारांचे कौतुक केले.

Don`t copy text!