Home चंद्रपूर जिवती नक्षली हल्ल्यात शहीद शूरवीरांना वाहिली आदरांजली

नक्षली हल्ल्यात शहीद शूरवीरांना वाहिली आदरांजली

457

बळीराम काळे / जिवती

जिवती:तालुक्यातील माराईपाटण येथे १० ऑगष्ट १९८९ रोजी झालेल्या नक्षलवादयांच्या भ्याड हल्ल्यात शाहिद पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्या समुर्थीप्रित्यर्थ पोलीस स्टेशन टेकामांडवाद्वारा आयोजित कार्यक्रमात शहीद जवानांणा आदरांजली वाहण्यात आली.

गडचांदुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या प्रमुख उपस्थितीत शहीद वीर जवानांना सलामी देऊन आदरांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी सपोनी सचिन जगताप,पोलीस उपनिरीक्षक शरद आवारे,तसेच पोलीस स्टेशन टेकामांडवाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र म्हैसकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी 365 दिवस चालणाऱ्या पालडोह शाळेतील विद्यार्थी यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय गडचांदुरच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.एस जी बुऱ्हाण ५९नागरिकांची डोळे तपासणी केली. यातील १५ नागरिकांना पुढील शस्त्रक्रियेसाठी पाठविण्यात आले.

कार्यक्रमाला जि.प.शाळेतील मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी,आकुनवर,ग्राम पंचायत माराईपाटणचे ग्रामसेवक जे.टी. मोहूर्ले,डॉ.लांजेवार,पोलिस पाटील राहुल एम.सोनकांबळे,उपसरपंच प्रल्हाद काळे,प्रदीप काळे,विद्यार्थी व समस्त गावकरी मंडळी आदी उपस्थिती होती.
प्रास्ताविक विकास सोनकांबळे तर संचालन मुख्यध्यापक राजेंद्र परतेकी यांनी केले. पोलीस स्टेशन टेकामंडवाचे ठाणेदार रवींद्र म्हैसेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Don`t copy text!