गडचिरोली जिल्हातील चामोर्शी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस… तालुक्यातील रेगडी येथे १३३ मिमी पाऊसाची नोंद

937

ब्युरोचीफ प्रशांत शाहा

चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या जिल्ह्यातील केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणारा चामोर्शी तालुक्यातील रेगडी व घोट या परिसरात मुसळधार पाऊस बरसला आहे.

चामोर्शी तालुक्यातील रेगडी परिसरात इतका भीषण पाऊस पडला की चक्क रेगडी या गावापासून एक किमी अंतरावर असलेला रेगडी टोला यांचा संपर्क रेगडी गावाशी तुटला आहे. घोट रेगडी हा मुख्य मार्ग जलमय झाला असून घोट ते रेगडी दरम्यान पोतेपल्ली तलाव ओव्हर फ्लो होत असल्याने रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दुसरीकडे याच मार्गावरील नवेगाव ते वरुड दरम्यान वरुड तलावाचे पाणी सुमारे एक फूट पर्यंत रस्त्यावरून वाहत आहे.

सकाळी काही वेळापर्यंत घोट रेगडी हा मार्ग बंद झाला होता. सध्या पाऊस थांबला असला तरी रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशयाचे ओव्हर फ्लो सुमारे चार फूट एवढा वाहत आहे. सायंकाळपर्यत अजून पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.