Homeगडचिरोलीट्रक ड्रायव्हर सुधाकर पुडकेचा कॅबीनमध्येच मृत्यू.  आरमोरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली...

ट्रक ड्रायव्हर सुधाकर पुडकेचा कॅबीनमध्येच मृत्यू.  आरमोरी पोलीस स्टेशन हद्दीत घडली घटना..  पोलीस निरीक्षक मनोज काळबांधे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू..

चक्रधर मेश्राम ..

गडचिरोली :- पोलीस स्टेशन आरमोरी अंतर्गत पालोरा -जोगीसाखरा रोड आरमोरी येथे दिनांक ३०/७/२२ रोजी १२.०० वाजता एका ट्रकच्या कॅबिनमध्ये एक इसम मयत असल्याचे पोलीस स्टेशन आरमोरी येथे माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन आरमोरीचे ठाणेदार श्री मनोज काळबांडे यांच्यासोबत सहाय्यक फौजदार चिकनकर पोना पिल्लेवान, पोना ताटपलान घटनास्थळी जावुन पाहणी केले असता एका इसमाचे आडे ट्रेडर्स यांच्या दुकाना समोर एक टाटा कंपनी चा ट्रक क्रमांक. MH 34 M – 4882 च्या केबिनमध्ये प्रेत मिळून आले. सदर मयत इसमाबाबत चौकशी केली असता त्याचे नाव सुधाकर कारुजी पुडके, वय 41 वर्ष ,राहणार फुटाणा तालुका पोंभुर्णा जिल्हा चंद्रपूर अशी ओळख असल्याची माहिती मयताचे नातेवाईक वामन मुकुंदा नागापुरे राहणार चांदापूर पो. फीस्कुटी ता.मूल जि. चंद्रपूर यांनी मयत इसम हे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीमध्ये आवारपूर येथे ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करित होते, असे सांगितले. तसेच पोलीस स्टेशन आरमोरी येथे येऊन मयताच्या मरणाबाबत कसल्याही प्रकारचा संशय अथवा तक्रार नसल्याबाबत कळविल्याने पोलीस स्टेशन आरमोरी येथे नोंद करण्यात आली आहे.
पुढील तपास तत्पर, कार्यकुशल पोलीस निरीक्षक श्री. मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार गौतम चिकनकर हे करीत आहेत.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!