Homeचंद्रपूरनवरगाव येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक संपन्न माजी मंत्री तथा आ. विजय...

नवरगाव येथे काँग्रेस कार्यकर्ता बैठक संपन्न माजी मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती

वैभव आत्राम (सिंदेवाही तालुका प्रतिनिधी)

आज दि.३० जुलै २०२२ रोजी सिंदेवाही तालुक्यांतील नवरगाव येथे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रमुख उपस्थितीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्भूमीवर कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणुन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे,दादाजी चंनबनवार, जानकीराम कांमडी ,चंद्रभूषण जयस्वाल, सरपंच राहुल बोडणे नवरगाव काँग्रेस कमिटी अध्यक्ष विनोद लोणकर, महिला अध्यक्षा चंद्रकला बोडणे, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष विजय पॅरामवार, सरफराज पठाण, मधुजी गहाने, प्रमोद कांमडी, उपसरपंच श्वेता कामडी, पवन जयस्वाल, संजय गहाने, सुशांत बोडणे, ठोणू जयस्वाल,प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना ता. अध्यक्ष रमाकांत लोधे म्हणाले की, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी च्या आरक्षणास सोडत आटोपली. पक्षाकडून निवडणूक रिंगणात चाचपणी अंती उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार असुन पक्ष उमेदवाराच्या विजयासाठी तन मन धनाने कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे आवाहन केले. यानंतर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री ,काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे महत्त्व पटवून दिले. यात आरक्षण सोडतीनंतर पक्षातील संघटनात्मक बांधणी याच जोरावर पुढील निवडणुकीच्या रिंगणात प्रतिस्पर्धींना प्रखर लढा देता येईल. तसेच पक्षाने चाचपणी अंती नेमलेला उमेदवारच हा पक्षाच्या अंतिम निर्णय यावर सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागून त्याला विजयी करणे हेच पक्षाचे ध्येय धोरण असून आपसी मतभेद व वैचारिक मतभेद बाजूला सारून विजयाचा प्रमुख मूलमंत्र हा एक संघ लढा देणे हेच होय असे मार्गदर्शनपर आ. विजय वडेट्टीवार यांनी उपस्थितांना संबंधित केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज उईके यांनी केले तर आभार विनोद लोणकर यांनी मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!