ब्रह्मपुरी:मागील पंधरा दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा या गावातील शेतकरी नवलाजी तुपट हे दुपारच्या वेळेस शेतावर गेले असता जोरदार पाऊस आला. यात मार्गावरील भुतीनाला ओसांडून वाहू लागल्याने परतिच्या वाटेवर असलेले नवलाजी तुपट यांचा तोल जाऊन ते पुरात वाहून गेले. या घटनेत त्यांचा करून अंत झाला. घरचा कर्ता पुरुष दगावल्याने तूपट कुटुंबीयांवर फार मोठे संकट कोसळले.
या घटनेची माहिती मिळताच राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी तहसीलदार उषा चौधरी यांना निर्देश देऊन घटनेचा पंचनामा तयार करून नैसर्गिक आपत्ती योजनेमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या. यावर ब्रह्मपुरी तहसीलदार उषा चौधरी यांनी बेटाळा येथील पुरात वाहून गेलेले शेतकरी नवलाजी तूपट यांचे मृत्यू बाबत संपूर्ण अहवाल तयार करून शासनाच्या वरिष्ठ स्तरावर पाठवला. अखेर क्षेत्र आ. विजय वडेट्टीवार यांनी दाखवलेली हिरिरी व शेतकऱ्यां प्रतीची प्रामाणिक तळमळ यामुळे घरचा करता पुरुष गमावलेल्या तूपट कुटुंबीयांना शासन स्तरावरून चार लक्ष रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले.
आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सांत्वन पर भेट घेऊन तूपट कुटुंबीयांना चार लक्ष रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी बेटाळा सरपंच नरेंद्र ढोंगे, तहसीलदार उषा चौधरी काँग्रेस ,तालुका अध्यक्ष खेमराज तिडके, नगरपरिषद गटनेता विलास विखार व बेटाळा ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते.
Home चंद्रपूर ब्रम्हपुरी नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना आ. वडेट्टीवारांच्या हस्ते धनादेशाचे वितरण..बेटाळा ता.ब्रह्मपुरी येथील तुपट कुटुंबीयांना...