Homeगडचिरोलीगडचिरोली पोलिसांना मोठे यश,MBBS डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक.

गडचिरोली पोलिसांना मोठे यश,MBBS डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक.

गडचिरोली : नक्षलवाद्यांना मदत करण्याच्या आरोपात कंत्राटी सरकारी MBBS डॉक्टरसह तीन नक्षल समर्थकांना अटक करण्यात आली आहे. पोलीसाची गस्त सुरु असताना नक्षल्यांचे शहिद सप्ताहाचे बॅनर लावतांना तीन जण सापडले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर भागात काही अज्ञात व्यक्ती नक्षलवाद्यांना बांधत असल्याची माहिती पोलीस विभागाच्या हाती लागली. त्यानुसार पोलिसांकडून ऑपरेशन राबवण्यात आले. अटक केलेल्यांमध्ये कमलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या MBBS डॉक्टर पवन उईकेचा समावेश आहे. डॉक्टरांसह या तिघांकडून नक्षल्यांना रसद पुरवली जात असल्याचा संश आहे. या तिघांवर UAPA( बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे) या कलमासह कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यंत संवेदनशील दुर्गम भागात झालेल्या या कारवाईने हादरले आहे. पोलिसांनी चौकशी सुरू असल्याचे कारण सांगत अधिक बोलण्यास नकार दिला आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात नक्षलवादाची दहशत निर्माण करण्यासाठी हे बॅनर नक्षलवादी नेहमी जंगल भागात लावले जातात. या आठवड्यात एक सरपंचाची नक्षलवाद्यांनी हत्या केली. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीसांनी ऑपरेशन राबवले होते. ऑपरेशन राबवित असताना बॅनर लावण्यात सहभागी होते. यावेळी त्यांना अटक करण्यात आली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!