रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशय झाले जलमय…अनेक मार्ग बंद…रेगडी परिसरातील अनेक गावाचा तुटला संपर्क…

504

ब्युरोचीफ प्रशांत शाहा
गडचिरोली/चामोर्शी: जिल्ह्यातील सर्वात मोठा व एकमेव असलेला रेगडी येथील कर्मवीर कन्नमवार जलाशय (दीना धरन) शंभर टक्के भरलेला असून, या धरणातील वेस्ट वेयर मधून ओव्हर फ्लो होत आहे.

ओव्हर फ्लो होत असल्यामुळे रेगडी ते एटापल्ली,आष्टी ते मूलचेरा,आष्टी ते आल्लापल्ली मार्ग बंद झाले होते.
सध्या रेगडी परिसरात पाऊस कमी झाल्याने आज सकाळ पासून आष्टी आल्लापल्ली,आष्टी मूलचेरा मार्ग सुरू झाला आहे
परंतु रेगडी ते देवदा या मार्गावर असलेल्या नाल्यावर पूल नसल्याने रेगडी एटापल्ली हा मार्ग बंद आहे.

या मार्गावरील पूल निर्माण झाल्यास अनेक मार्ग मोकळे होणार तीन तालुक्यातीचा जिल्ह्याशी संपर्क तुटणार नाही हे नक्की
देवदा ते रेगडी दरम्यान असलेल्या दीना नदी या पुलाच काम मंजूर झाला आहे तरी शासनाणी या पुलाचा कामाकडे लक्ष द्यावे अशी मागनी परिसरात होत आहे.