-सुरज पि. दहागावकर (कार्यकारी संपादक)
चंद्रपुर: चंद्रपुर शहराला लागूनच असलेल्या स्थानिक सहारा पार्क, राजनगर, ग्राम.पं.आरवट इथे गेल्या दोन दिवसांपासून पुराने थैमान घातलेले आहे. लोकांची घरे पूर्णपणे पाण्याने वेढलेले आहे. अश्यातच बऱ्याच लोकांनी पूर्वनियोजन करून तिथून आधीच स्थलांतर केले, मात्र कित्येक परिवार तिथे पाण्यात अडककेले होते.
अश्यातच या लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF ची टीम तिथे दाखल झाली आणि त्या टीम च्या माध्यमातून चारही दिशा पाणी असताना सुद्धा प्रलयने लोकांची मदत करण्याची कामगिरी केली. यामध्ये सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.
विशेष म्हणजे स्वतः प्रलय च्या घरात कित्येक त्यांच्या दैनंदिन वस्तू, आजपर्यंत कमावलेले प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह आणि आयुष्याची पूर्ण दस्तऐवज पाण्यात भिजत असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचे दुःख न करता लोकांची मदत केल्याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे..






