Home गडचिरोली नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

663

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधल्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली आहे.

याठिकाणी मवेली ते मोहुर्ली दरम्यान नवीन रस्ते बांधण्यात येत असून वल्लभभानी कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीकडे या कामाचे कंत्राट आहे. नक्षलवाद्यांनी रविवारी १५ मे च्या रात्री तेथील वाहनांची जाळपोळ केली. यात दोन पोकलेन ,एक ट्रैक्टर एक ग्रेडर, एका ट्रकचा समावेश असून अंदाजीत अडीच कोटीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांना या जाळपोळीची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाच्या पंचनाम्यानंतरच नेमके किती नुकसान झाले याची कल्पना मिळू शकेल. नक्षलवाद्यांनी दोन दिवसांपूर्वी याच परिसरात एका इसमाची हत्या केल्यानतर जाळपोळ घडवून आणल्यामुळे स्थानिक नागरिकात दहशत निर्माण झाली आहे .

Don`t copy text!