Homeनागपूरसेवादल नगर नागपूर येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

सेवादल नगर नागपूर येथे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

नागपूर : दिनांक 07/04/2022 रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त वरदान इंडियन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ अडोपशन चाइल्ड वेल्फेअर द्वारा संचालित स्कूल हाउस फॉर चिल्ड्रेन इन डीफिकल्ट सरकमस्टन्सेस युनिट क्रमांक 6, सेवादल नगर नागपुर येथे जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यामध्ये 18 वर्षाखालील लहान बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

आरोग्य शिबीर तपासणीचे आयोजन वरदान संस्थे अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या चाईल्ड लाईन कोल्याबोरेटिव्ह ऑर्गनायझेशन मार्फत करण्यात आले. यामध्ये डॉक्टरांच्या चमूने उत्कृष्टरित्या लहान बालकांची तपासणी करून गरजू बालकांना औषधे वाटप करण्यात आली.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथील डॉ.अश्विनी भुजाडे, डॉ.शैलिका मस्के, डॉ. तुषार बोरकर, अमित मोहारे(औषध निर्माण अधिकारी),प्रितम डकरे(औषध निर्माण अधिकारी),रुपाली सोनटक्के(ANM),अंजु सुके(ANM) व वरदान चाइल्ड लाइन तर्फे अमरजा खेडीकर(चाईल्डलाईन केंद्र समन्वयीका), विजया पंदीलवार(समन्वयीका स्कुल हाऊस व समुपदेशिका), सीमा गोडे(समाजकार्यकर्ता),पूजा कांबळे,मंगला टेंभुर्ने, मेघा पाटील,सचिन धोतरकर, कुलदीप माहुरकर (टीम मेम्बर्स), व क्षेत्र कार्यासाठी तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय नागपूर MSW 1चे विध्यार्थी उपस्थिती होते. या शिबिरात गरजू बालकांना औषध उपचार व लाभार्थ्यांना आरोग्य विषयी आणि संतुलित आहार विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!